ETV Bharat / bharat

Inaugurate National Games: खेळाडूंच्या विजयाने देशाची प्रतिमा सुधारते! उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे प्रतिपादन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात दौरा

नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंतप्रधानांच्या हस्ते आज गुरुवार (दि. 29 सप्टेंबर)रोजी 36व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण इतिहास घडवला आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम देशातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन आपण केले आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन

author img

By

Published : Sep 29, 2022, 9:52 PM IST

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी अहमदाबाद, गांधीनगर, सूरत, भावनगर आणि अंबाजी येथे भेट देणार आहेत. याठिकाणच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार असून, लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरत येथे हजारो प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.

  • The largest stadium in the world is hosting the largest sports event for the nation with the youngest population: PM Narendra Modi as he declares open the 36th National Games at Narendra Modi stadium in Ahmedabad, Gujarat pic.twitter.com/3RczUTWh0x

    — ANI (@ANI) September 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पहिल्यांदाच ही स्पर्धा होत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून सूरतमध्ये त्यांनी तब्बल ३४०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी भूमीपूजन पार पडले. गुजरातमध्ये ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडणार असून, त्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. गुजरातमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा होत आहे. मोदींच्या स्वागतासाठी सूरतमध्ये लोकांची गर्दी झाली होती.

सूरत म्हणजे मिनी-भारतच आहे - गुजरातमध्ये डबल इंजिन सरकार आल्यानंतर घर बांधणीच्या कामाला वेग आला आहे. सूरतमधील मध्यमवर्गीय, गरीब लोकांनाही सुविधा मिळत आहेत. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत देशातील चार कोटी रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत. यामधील ३२ लाख गुजरात आणि १ लाख २५ हजार सूरतमधील आहेत. नवरात्र साजरी होत असतानाच पायाभूत सुविधांचे भूमीपूजन, क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करणे हे माझे भाग्य समजतो. सूरत हे एकतेचे उत्तम उदाहरण आहे. देशभरातील लोक सूरतमध्ये वास्तव्यास आहेत. ही मिनी-भारत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

  • #WATCH PM Modi accompanied by Gujarat CM Bhupendra Patel greets the crowds at the opening ceremony of the 36th National Games at Narendra Modi stadium in Ahmedabad

    (Source: DD) pic.twitter.com/EtRCZIlfvt

खेळाडूंनी खेळात रोष निर्माण करण्यास सुरुवात केली - आधीच्या सरकारांवर निशाणा साधत ते म्हणाले की, कुटुंबवाद आणि भ्रष्टाचारामुळे भारताच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशा संधी मिळत नव्हत्या, मात्र आता त्यात खूप बदल झाला आहे. 'ज्या खेळांचे जग ऑलिम्पिकसाठी वेड लावते, ते खेळ आमच्याकडे खेळले जात नव्हते. आता वातावरण नवे आहे, 2014 पासून खेळाडूंनी खेळात रोष निर्माण करण्यास सुरुवात केली, तसेच त्याची वेगाने वाढ होत आहे असही ते म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.