ETV Bharat / bharat

PM Modi : मी एकटाच अनेकांवर भारी पडल्याचे देश पाहतोय; मोदी राज्यसभेत आक्रमक

author img

By

Published : Feb 9, 2023, 8:02 PM IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काल लोकसभेत भाषण केल्यानंतर आज गुरुवार (9 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण केले. (PM Narendra Modi Rajya Sabha Speech) या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाषण सुरू असताना सभागृहात विरोधकांच्या घोषणा सुरू होत्या त्यावर बोलताना सर्वांना एकटा भारी पडला असे म्हणत त्यांनी स्वत:चीच पाठ थोपटली आहे.

PM Modi
मोदी राज्यसभेत आक्रमक

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, एकटाच अनेकांवर भारी पडल्याचे संपूर्ण देश पाहत आहे. वास्तविक, जेव्हा पंतप्रधान मोदी उत्तर देत होते तेव्हा विरोधी पक्षातील अनेक नेते घोषणा देत होते त्यावर मोदींनी ही वरील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, काही लोक राजकीय खेळ खेळतात. आणि नंतर त्यामधून पळून जाण्यासाठी काहीतरी निमित्त शोधत असतात. परंतु, हा देश सर्वांचा आहे. तो कोणा एका व्यक्तीची जहागिरी नाही असे म्हणत त्यांनी पुन्हा गांधी घराण्याला डिवचले आहे. त्याबरोबरच जे नेहरूंना आपले वंशज मानतात, त्यांचाही आपल्या नावात नेहरू जोडण्यास आक्षेप आहे, असे का? असा प्रश्नही मोदी यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

केरळ सरकारचा दाखला : विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले, विरोधकांनी (कलम 356)चा वारंवार वापर केला. त्यांनी कधीच विरोधी पक्षाचे सरकार चालू दिले नाही. यावेळी मोदी यांनी केरळ सरकारचा दाखला दिला आहे. केरळमध्ये डावे सरकार आले होते. मात्र, नेहरुंना ते आवडले नाही आणि त्यांनी ते सरकार पाडले असा थेट घणाघात मोदी यांनी यांनी यावेळी बोलताना केला आहे. एवढेच नाही तर, त्यांनी तामिळानाडूत द्रमुक पक्षाचे करुणानिधी सरकार पाडले. मात्र, आज हेच द्रमुक आणि डाव्यांच्या पाठीशी उभे आहेत असही ते यावेळी म्हणाले आहेत.

आमच्या काळात तुष्टीकरण नाही : पंतप्रधानांनी एनत्रामाराव यांचाही उल्लेख केला. काँग्रेसने त्यांच्यासारख्या व्यक्तीलाही सोडले नाही, असेही ते म्हणाले. त्यांचे सरकारही पाडण्यात आले. त्यांना त्रास दिला. मात्र, आम्ही त्या पद्धतीने काम करत नाही, असही मोदी यावेळी म्हणाले आहेत. आम्ही माझे-तुझेही करत नाही. आम्ही भेदभाव समाप्त करत आहोत. आमच्या काळात तुष्टीकरण नाही. आमचे माध्यम हे सेवेचे माध्यम आहे. आम्ही विकासाचे ते मॉडेल देत आहोत ज्यात संबंधितांची काळजी घेतली जात आहे असही ते म्हणाले आहेत.

तुम्ही जितका चिखल उडाल तितके कमळ फुलेल : यावेळी पंतप्रधानांनी काही कवीतेच्या ओळी वाचत विरोधकांना उद्देशुन तुम्ही जितका चिखल उडवाल तितके कमळ फुलेल असा पलटवार विरोधकांवर केला आहे. तसेच, कमळ फुलण्यात फक्त भाजपचाच वाटा नसून विरोधकांचाही वाटा आहे असे म्हणत त्यांनी जोरदार हल्ला केला आहे. तसेच, तुम्ही योगदान दिल्याबद्दल मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे कृतज्ञता व्यक्त करतो असही म्हणत विरोधकांवर मोदिंनी चांगलीच टीका केली आहे.

हेही वाचा : शरद पवारांचंही सरकार पाडलं! मोदींनी वाचला काँग्रेसचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.