ETV Bharat / bharat

मुंबईत पेट्रोल आजपर्यंतच्या उच्चांकी पातळीवर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर! - आजचे पेट्रोल दर

भारतातील तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होते. तेलाच्या किंमती वाढण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती आणि केंद्र व राज्ये यांच्याकडून उच्च कर दरात वाढ. पेट्रोल आणि डिझेलवरील कराचे दर राज्यात वेगवेगळे असतात. आज पेट्रोलमध्ये 26 पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे, तर डिझेलमध्येही 7 पैशांची वाढ झाली आहे.

पेट्रोल
पेट्रोल
author img

By

Published : Jun 24, 2021, 10:17 AM IST

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गुरुवारी पुन्हा वाढ झाली. आज पेट्रोलमध्ये 26 पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे, तर डिझेलमध्येही 7 पैशांची वाढ झाली आहे. बुधवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या पुढे गेली आहे. गेल्या दोन वर्षांत प्रथमच ब्रेंट क्रूडच्या किंमतीने ही पातळी ओलांडली आहे. दिल्लीत पेट्रोल आज प्रतिलिटर 97.76 रुपये तर डिझेल 88.30 रुपये प्रतिलिटर झाले. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर येथे पेट्रोल 103.89 रुपयांवर पोहचले आहे. डिझेलची किंमत 95.79 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 97.63 रुपये आणि डिझेल 91.15 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर ते अनुक्रमे 98.88 आणि 92.89 रुपये आहे.

आज लखनौमध्ये पेट्रोल 94.95 रुपये तर डिझेल 88.71 रुपये प्रतिलिटर आहे. पाटण्यात पेट्रोल 97.95 रुपये तर डिझेल 93.63 रुपये प्रति लिटर आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर सर्व दर जोडल्याने इंधनाची किंमती जवळजवळ दुप्पट होते. देशाला 89 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. म्हणूनच जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीमध्ये चढ-उतार होतो. तेव्हा भारतातील तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होते. तेलाच्या किंमती वाढण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती आणि केंद्र व राज्ये यांच्याकडून उच्च कर दरात वाढ. पेट्रोल आणि डिझेलवरील कराचे दर राज्यात वेगवेगळे असतात.

शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली 97.76 88.30
मुंबई 103.89 95.79
कोलकाता 97.63 91.15
चेन्नई 98.88 92.89

वाढत्या इंधन दरासाठी जबाबदार कोण?

कोविड संकटाच्या या काळात जणू जखमेवर मीठ चोळण्याचे कामच सध्या होत आहे. पेट्रोलवर मोठा कर लावल्याने जनता अडचणींच्या खोल भोवऱ्यात अडकत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे देशभरात नाराजी आहे. पंतप्रधान मोदींनी एलपीजीला जीएसटी अंतर्गत आणण्याची आपल्या सरकारची बांधिलकी व्यक्त केली आहे. पेट्रोल आणि डिझेलदेखील जीएसटीखाली आणण्याची मागणी संसदेमध्ये होत आहे. 2008 साली जेव्हा कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 150 डॉलर होती, तेव्हा एक लिटर पेट्रोलची किंमत 50 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 35 रुपये होती. आता, जेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलर्स आहे, तेव्हा इंधनाचे दर उच्चांकी का आहेत?, असा सवाल नागरिक करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.