९० टक्के राशन कार्डला आधार कार्डला जोडण्यात आले आहे. नव्या संसदेचे बांधकाम सुरू. नवी संसदेची इमारत बांधण्याचा प्रयत्न आधीच्या सरकारांनीही केला. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना संसदेचे बांधकाम सुरू झाले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण - केंद्रीय बजेट २०२१
11:58 January 29
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे भाषण सुरू
11:57 January 29
१३ लाख कोटी रुपये थेट हस्तांतराद्वारे लाभार्थ्यांना देण्यात आले. मध्यमवर्गींयांना रेरा कायद्याचा लाभ मिळाला आहे. जुन्या पंधराशे कायद्यांना रद्द करण्यात आले आहे.
11:54 January 29
३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मिरमधील जनतेला नवे अधिकार मिळाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिन 2021 पासून 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
11:53 January 29
अनेक देशांना अत्यावश्यक औषधे भारताने दिले. कोरोना विरोधातील लस निर्यात केली.
पॅरिस करार लागू करण्यासाठी भारत आघाडीवर. कच्छमध्ये नवीकरीय उर्जा निर्मितीसाठी काम सुरू.
11:50 January 29
सीमेवरील शांतता भंग करण्याचा प्रयत्न - राष्ट्रपती
सीमेवर शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जवानांनी हे प्रयत्न उधळून लावले. आपल्या २० वीर जवानांनी शत्रूशी लढताना बलिदान दिले. सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहे.
11:37 January 29
केंद्रीय कृषी कायद्यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून कौतूक
11:33 January 29
प्रजासत्ताक दिनी झालेल्या दिल्लीतील हिंसाचारावर बोलताना राष्ट्रपती
11:28 January 29
ग्रामीण भागात पायाभूत सुविधा सरकारने उभारल्या -
जल जीवन मिशनवर सरकारचे काम सुरू. तीन कोटी कुटुंबांना पाईपलाईनद्वारे पिण्याचे पाणी पोहचवले. ग्रामीण भागात रस्ते विकसित करण्यात येत आहेत. वीज गावागांवात पोहचवल्यानंतर सरकार ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे इंटरनेट ग्रामीण भागात पोहचवत आहे.
11:21 January 29
कृषी कायद्यांमुळे १० कोटी अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ सुरू
लहान शेतकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारचे प्रयत्न. कृषी कायद्यांमुळे १० कोटी लहान शेतकऱ्यांना फायदा मिळणे सुरू झाला आहे. ज्या शेती सुधारणांवर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यानुसार कायदे पास करण्यात आले. शेती कायद्यांबाबत निर्माण केलेल्या संभ्रमांना दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे जुने अधिकार हिरावले जाणार नाहीत. उलट आणखी नवे अधिकार दिले आहेत.
11:15 January 29
आरोग्य सुविधांचा विस्तार
आरोग्य सेवांचा विस्तार गरजेचा. २०१४ साली देशात फक्त ३८७ मेडिकल महाविद्यालये होते. मात्र, आता देशात ५६२ महाविद्यालये आहेत. २२ नव्या एम्स रुग्णालयांना मंजुरी. राष्ट्रीय मेडिकल कमिशनचीही स्थापना केली. आत्मनिर्भर भारत अभियानाासाठी कृषी क्षेत्राचा सरकारने विकास केला.
11:09 January 29
आत्मनिर्भर भारत करण्यासाठी काम सुरू. नवउद्योग प्रस्थापित होत आहेत. जगातील सर्वात मोठे कोरोना लसीकरण सुरू आहे. लसही भारतीय बनावटी आहे. भारताने अनेक देशांना लस पुरवली.
11:08 January 29
कोरोना काळात सरकारची मदत - राष्ट्रपती
गरीब नागरिक उपाशी राहू नये म्हणून सरकारने काळजी घेतली. गरिबांना धान्य मोफत दिले. स्थलांतरित मजूरांची काळजी घेतली. कोरोना काळात मजूरांना घरी जाण्यासाठी रेल्वे सुरू केल्या. गरीब कल्याण रोजगार योजना गावी गेलेल्या मजूरांना काम देण्यासाठी सुरू केली. उज्वला योजनेंतर्गत १४ कोटी गॅस वाटप केले.
11:05 January 29
संकट कितीही मोठे असू द्या, भारत थांबणार नाही - राष्ट्रपती
कोरोना महामारी, पूर, भूकंप, वादळ, बर्ड फ्लू आणि टोळधाडमध्ये भारतीयांनी एकजूट होऊन काम केले. सीमेवरही संकट निर्माण झाले. मात्र, प्रत्येक संकटातून भारत बाहेर पडला. कोरोनामुळे अनेक जण आपल्याला सोडून गेले. माजी राष्ट्रपतींसह सहा खासदार कोरोनामुळे आपल्याला सोडून गेले.
11:01 January 29
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू झाले आहे
10:59 January 29
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदींनी पत्रकारांशी संवाद साधला
10:52 January 29
राष्ट्रपती संसदेत दाखल, पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपतींचे अभिभाषण थोड्याच वेळात सुरू होणार
10:47 January 29
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींचे अभिभाषण
नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. देशातील १६ विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मागील पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत विरोधी पक्षांची मागणी फेटाळून केंद्र सरकारने तीन वादग्रस्त कृषी विधेयके घाईघाईने मंजूर केले. या कृतीचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे हे अधिवेशन कृषी कायद्यांमुळे चांगलेच गाजणार आहे.
या पक्षांचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार -
राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आम्ही 16 राजकीय पक्षांच्या वतीने निवेदन जारी करत आहोत, असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, सपा, आरजेडी, माकप, सीपीआय, आयआयएमएल, आरएसपी, पीडीपी, एमडीएमके, केरळ काँग्रेस (एम) आणि एआययूडीएफ यांनी संयुक्तपणे घेतला आहे.
हे अधिवेशन दोन भागांमध्ये होणार आहे. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी असा या अधिवेशनाचा पहिला टप्पा असेल. तर, आठ मार्च ते आठ एप्रिलपर्यंत या अधिवेशनाचा दुसरा टप्पा पार पडेल. तसेच, १७ व्या लोकसभेच्या पाचव्या अधिवेशनात ३५ बैठका होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात यातील ११ बैठका पार पडतील. तर, दुसऱ्या टप्प्यात २४ बैठका पार पडतील.