ETV Bharat / bharat

जेव्हा तुमच्या लग्नात अचानक येतात राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री..

'गोवा लिबरेशन डे' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शनिवारी राष्ट्रपती कोविंद हे गोव्यात आले होते. त्यानंतर रविवारी ते पणजीपासून १६ किलोमीटर दूर असणाऱ्या महालसा नारायणी मंदिरात दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा राष्ट्रपती कोविंद मंदिर परिसरात पोहोचले, तेव्हा तिथे एक विवाह सोहळा सुरू असल्याचे त्यांना दिसले. यानंतर राष्ट्रपतींनी या नवदाम्पत्याला आशिर्वाद देण्याची इच्छा प्रकट केली...

President, Governor and Chief Minister arrived in Goa temple
जेव्हा तुमच्या लग्नात अचानक येतात राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री..
author img

By

Published : Dec 21, 2020, 10:04 AM IST

पणजी : विचार करा, एखाद्या मंदिरात साध्या पद्धतीने तुमचा विवाह सोहळा पार पडतो आहे; आणि अचानक तुमच्या लग्नाला राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही उपस्थित झाले तर? गोव्यातील एका दाम्पत्याच्या बाबतीत असाच प्रकार झाला. राज्यातील प्रसिद्ध महालसा नारायणी मंदिरात विवाह सुरू असलेल्या एका नवदाम्पत्याला राष्ट्रपतींनी आपले आशिर्वाद दिले.

मिळालेल्या माहितीनुसार 'गोवा लिबरेशन डे' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शनिवारी राष्ट्रपती कोविंद हे गोव्यात आले होते. त्यानंतर रविवारी ते पणजीपासून १६ किलोमीटर दूर असणाऱ्या महालसा नारायणी मंदिरात दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा राष्ट्रपती कोविंद मंदिर परिसरात पोहोचले, तेव्हा तिथे एक विवाह सोहळा सुरू असल्याचे त्यांना दिसले. यानंतर राष्ट्रपतींनी या नवदाम्पत्याला आशिर्वाद देण्याची इच्छा प्रकट केली. राष्ट्रपतींसोबत दर्शनासाठी राज्यपाल कोश्यारी आणि राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. त्यांनीदेखील कोविंद यांच्यासह या दाम्पत्याला आशिर्वाद दिले.

President, Governor and Chief Minister arrived in Goa temple
जेव्हा तुमच्या लग्नात अचानक येतात राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री..

दाम्पत्याचा आनंद द्विगुणीत..

आपल्या लग्नाला राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री अशा उच्चपदस्थ व्यक्तींनी आपल्या लग्नाला उपस्थिती दर्शवल्यामुळे या दाम्पत्याच्या आनंद द्विगुणीत झाला. हे खरंच वाटत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राष्ट्रपती कार्यालयाने केले ट्विट..

दरम्यान, या लग्नसोहळ्याचे फोटो राष्ट्रपती कार्यालयाने ट्विट केले. एका मंदिरात एकाच दिवशी विवाह सोहळा आणि राष्ट्रपतींचा दौरा असणे असा योगायोग फारच क्वचित आढळतो अशा आशयाचे कॅप्शन या फोटोंना देण्यात आले आहे.

हेही वाचा : दिल्ली, चंडीगडमध्ये शिमल्यापेक्षाही अधिक थंडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.