ETV Bharat / bharat

गर्भवती महिलांनी कोरोना लस घ्यावी का? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला जाणून घ्या - लसीकरण

लस कधी मिळणार? हा प्रश्न गर्भवती महिलांना पडला होता. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस द्यायला मान्यता दिली.

Pregnant women
गर्भवती महिला
author img

By

Published : Jul 4, 2021, 10:29 AM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. गेल्या 16 जानेवरीपासून देशभरात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. सुरवातील गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना लसीकरणातून वगळण्यात आले होते. त्यामुळे लस कधी मिळणार? हा प्रश्न गर्भवती महिलांना पडला होता. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस द्यायला मान्यता दिली.

कोरोना लसीकरणाविषयीच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीनं याबाबत शिफारस केली होती. त्यानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोविन पोर्टलवर पूर्व नोंदणी करून किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन गर्भवती महिलांना लस घेता येणार आहे. तसेच 18 वयापुढच्या नागरिकांसाठीच्या प्रक्रियेनुसारच गर्भवती महिलांसाठीची ही लसीकरणाची प्रक्रिया असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट

गर्भवती महिलांना कोरोना लस देण्याबाबत जागरूक केले जाईल. या कामात आरोग्य विभागातील आशा कामगारांसह इंडियन मेडिकल असोसिएशन, महिला फिजीशियन ऑर्गनायझेशन आणि पेडियाट्रिक मेडिकल असोसिएशनचीही मदत घेण्यात येणार आहे. खासगी रुग्णालय चालकांना गर्भवती महिलांना लस देण्यास सांगितले जाईल. आशा कामगारही गर्भवती महिलांना लस घेण्यासाठी प्रवृत करतील.

गरोदर महिलांना लस देण्यास सरकारची मान्यता मिळाली आहे. लस घेण्यासाठी गर्भवती महिलांनी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे उप-सिव्हिल सर्जन आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेणु चावला यांनी केले. तसेच जर गर्भवती महिलांनी लस घेतली नाही. तर बरेच नुकसान होऊ शकते. अकाली प्रसूती होऊ शकते, कमी वजन असलेल्या बाळाचा जन्म होवू शकतो. तसेच बाळाचा मृत्यूही होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. आतापर्यंत अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, इस्त्रायल, कॅनडा यासह अनेक देशांमध्ये गर्भवती महिलांना लसी देण्याचे काम सुरू झाले आहे.केले.

गर्भवती महिलांनी कोरोनाबाबत खबरदारी घ्यावी -

कोरोना विषाणूचा धोका गर्भवती महिलांना आहे. कारण गर्भवती अवस्थेत स्त्रियांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीविरुद्ध लढायची कमी क्षमता असते. म्हणूनच गर्भवती महिलांनी काळजी घेणे ही सर्वात महत्वाची बाब आहे. गर्भवती महिलांनी काळजी करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे अशा महिलांनी अजिबात ताणतणाव घेणे टाळावे. आरामात राहावे, जेणेकरुन तुमचे मन शांत राहील. गर्भधारणा शेवटच्या टप्प्यावर असेल तर डॉक्टरांकडून नियमित तपासणी करावी. ही खबरदारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.