ETV Bharat / bharat

Goa Election Update : गोव्यातील 33 टक्के ख्रिश्चन मतांसाठी पक्षांची मोर्चेबांधणी - ३३ टक्के मतदार ख्रिश्चन

गोव्यातील मतदारांची संख्या (Number of voters in Goa) पाहता ३३ टक्के मतदार हे ख्रिश्चन (33% of voters are Christians) आहेत त्यामुळे या मतदारसंघांमध्ये ख्रिश्चन मतदारांचा प्राबल्य आहे तिथे ख्रिश्चन उमेदवार देण्यावर सर्वच पक्षांनी भर दिल्याचे उमेदवार यादी वरून समोर येत आहे.

Goa Election Update
गोवा निवडणुक
author img

By

Published : Feb 2, 2022, 6:58 AM IST

पणजी: गोवा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचत आहे यंदा गोव्यात जातीय समीकरणावर निवडणुका लढवल्या जातील असे म्हटले जात होते. वास्तविक ज्या मतदारसंघांमध्ये ज्या समाजाच्या मतदारांचे प्राबल्य आहे त्या समाजातील उमेदवाराला तिकीट देण्याचा प्रघात पूर्वीपासूनच असल्याचे वरिष्ठ पत्रकार किशोर नाईक गावकर सांगतात. त्यामूळे गोव्यात ख्रिश्चन समाजाच्या मतदार संख्येला (The electorate of the Christian community) महत्व आहे. गोव्यात 33 टक्के मतदार संख्या ही ख्रिश्चनांची (33% of voters are Christians) आहे. त्यामुळे विशिष्ट मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांनी कसे उमेदवार दिले आहेत हे आपल्या लक्षात येईल असेही गावकर म्हणाले.

काँग्रेसने दिली सतरा ख्रिश्चन उमेदवारांना तिकिटे
गोव्यातील ख्रिश्चन मतदारांना प्रभावित करण्यासाठी काँग्रेस आघाडीवर आहे काँग्रेसने सतरा मतदारसंघांमधून ख्रिश्चन उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. ३३ टक्के मतदारांच्या संख्येत ही उमेदवारी पर्याप्त आहे. तळेगाव, कुंकॉलीम, क्युपे, सेंट क्रूज, दाभोली, कोर्टरिम नावेलिम, सिलिम, अल्डोना, करतोरी, पणजी, वास्को द गामा, नुवेम, वेलिम, कळंगुट आणि आंद्रे या मतदारसंघांमध्ये ख्रिश्चन समाजाच्या उमेदवाराला प्राधान्य दिले आहे.

भाजपाने दिली तेरा उमेदवारांना तिकिटे
भाजपानेही ख्रिश्चन समाजाच्या 13 उमेदवारांना तिकिटे देऊन समाजाला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप आणि उमेदवारांनी दिलेल्या मतदारसंघांमध्ये मापुसा माद्रे, अल्डोना, पणजी तळेगाव आंद्रे दाभोली, कुंनकोली, वेलिंम, कुरचेड, कळंगुट, सेट क्रूज आणि करतोरीम या तेरा मतदारसंघांचा समावेश आहे.

आपने दिली आठ क्रिश्चन उमेदवारांना संधी
गोव्यामध्ये भंडारी समाजाचा उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून देणाऱ्या आपने ही आज मतदारसंघांमध्ये उमेदवारी ख्रिश्चन समाजाच्या उमेदवाराला दिली आहे. यामध्ये बेनीलिम, नावेलिम, करतो रिम, तळेगाव वेलिंग, मडगाव, कुरचेड आणि कूपे या आठ मतदार संघात मध्ये तिकीट दिले आहे.

तृणमूलनेही दिली तेरा ख्रिश्चन उमेदवारांना तिकीटे
गोव्यात पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्‍या तृणमूल काँग्रेसने गोव्यातील ख्रिश्चन समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनेही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी आघाडी करूनही तेरा क्रिश्चन समाजातील उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या युतीतील मग गोपने एकाही ख्रिश्चन उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. तृणमूलने सिलिंम, कळंगुट सेंट क्रूज आंद्रे, काबुजा, कर्टेम, नोवेल नुवेम करतोरीम, फतोर्दा, बिनोली, वेलिंम. नावेलि, कुणकोली या मतदारसंघांमध्ये उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी शिवसेना युतीचीही ख्रिश्चन उमेदवारांना संधी
गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पहिल्यांदाच महा विकास आघाडी म्हणून एकत्रपणे निवडणुका लढवत आहे. राष्ट्रवादीचे १३ तर शिवसेनेचे अकरा उमेदवार रिंगणात उभे आहेत. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या 13 उमेदवारांपैकी ख्रिश्चन समाजातील सात उमेदवारांना संधी दिली आहे. तर शिवसेनेने अकरा उमेदवारांपैकी दोन ख्रिश्चन समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीने थीवी, संगे, मार्मागोवा , वेलिंम, दाभोली, कुबेर आणि आंद्रे या मतदारसंघांमध्ये उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने शिवोली आणि केपे या मतदारसंघांमध्ये ख्रिश्‍चन समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे.

हेही वाचा : Shiv Sena Support to Utpal Parrikar : शिवसेनेचा उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा; पणजीमधून घेतला उमेदवार मागे, राऊत म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.