ETV Bharat / bharat

प्रशांत किशोर-सोनिया गांधी भेट; पवारांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवर चर्चा नाही - प्रशा्ंत किशोर बातमी

राजकीय निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली.

sharad pawar and prashant kishor
शरद पवार आणि प्रशांत किशोर
author img

By

Published : Jul 14, 2021, 4:18 PM IST

Updated : Jul 15, 2021, 3:48 PM IST

नवी दिल्ली - राजकीय निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, या बैठकीत पंजाबमधील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याची माहिती आता समोर आली आहे.

ncp twitter
राष्ट्रवादीचे ट्विट

प्रशांत किशोर यांनी सध्या देशातील विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी बैठकांचा सपाटा लावला आहे. याआधी प्रशांत किशोर यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर पवार यांची दिल्लीतही प्रशांत किशोर यांची भेट झाली. शरद पवार यांच्या भेटीआधी प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेसच्या भेटीनंतर अनेक तर्क लावले जात होते.

प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची घेतली होती भेट-

प्रशांत किशोर यांनी 11 जून रोजी शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये साडे तीन तास चर्चा झाली होती. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पवारांसोबत जेवणही केले होते. या भेटीदरम्यान काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. त्यावेळी या भेट राजकीय नसल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर काही दिवसांनी पवार दिल्लीत आले असता प्रशांत किशोर यांनी पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यावरुन या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - काँग्रेसच्या भाई जगतापांची विधानपरिषदेवर जाण्याची संधी हुकणार?

Last Updated : Jul 15, 2021, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.