ETV Bharat / bharat

Shashi Tharoor: थरूर यांच्या राज्यभर तुफानी दौऱ्याचा राजकीय अर्थ काय?, वाचा सविस्तर

थरूर यांच्या दौऱ्यामुळे विरोधी पक्षनेते व्ही डी सतीशन यांना सर्वाधिक धक्का बसला आहे. थरूर यांच्या केरळ दौर्‍यावर सतीशन यांनी स्पष्टपणे टीका केली होती आणि त्यांना थेट सांगितले होते की कोणीही पक्षशिस्तीचे उल्लंघन करू नये. तथापि, थरूर यांच्या विरोधातील त्यांच्या भूमिकेला त्यांना कोणाचेही खुले समर्थन मिळाले नाही.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 26, 2022, 9:41 PM IST

तिरुअनंतपुरम (केरळ) : खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) सध्या केरळच्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी धसका घेतला आहे. मात्र यामुळे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या घटकांमध्ये एक नवीन आशा निर्माण केली आहे, जे थरूर यांच्यावरील त्यांच्या प्रेमाचे प्रदर्शन करण्यास आघाडीवर आहेत. त्यांच्यातील अनेकांचा असा विश्वास आहे की, नवीन पटनायक यांनी ओडिशात जी जादू केली ती जादू शशी थरूर केरळात पुन्हा निर्माण करू शकतात. (Shashi Tharoor kerala daura).

थरूर यांच्या नेतृत्वाला सर्वत्र मान्यता : थरूर यांच्या दौऱ्यामुळे विरोधी पक्षनेते व्ही डी सतीशन यांना सर्वाधिक धक्का बसला आहे. थरूर यांच्या केरळ दौर्‍यावर सतीशन यांनी स्पष्टपणे टीका केली होती आणि त्यांना थेट सांगितले होते की कोणीही पक्षशिस्तीचे उल्लंघन करू नये. तथापि, थरूर यांच्या विरोधातील त्यांच्या भूमिकेला त्यांना कोणाचेही खुले समर्थन मिळाले नाही. उलटपक्षी, थरूर यांना कॅडर आणि यूडीएफच्या प्रमुख घटकांमध्येही व्यापक मान्यता मिळाली. व्ही.डी. सतीशन यांच्यासारख्यांना चिंता वाटणारी गोष्ट म्हणजे थरूर यांचे आययूएमएलने केलेले उत्स्फूर्त स्वागत. आययूएमएलच्या नेत्यांनी थरूर यांना आययूएमएलच्या धार्मिक आणि राजकीय मुख्यालय असलेल्या पनाकड येथे आमंत्रित केले आणि त्यांना एक भव्य मेजवानी दिली. UDF च्या धोरणांचे मोठे समर्थक असलेल्या चर्चनेही थरूर यांचे स्वागत केले. सलग 10 वर्षे सत्तेबाहेर असलेल्या UDF घटकांना केरळमध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी एक उर्जावान नेतृत्व हवे आहे आणि ते थरूर यांच्यात हे नेतृत्व पाहत आहेत.

दौऱ्याची ठिकाणे बारकाईने निवडली : काँग्रेसच्या काही नेत्यांच्या विरोधामुळे थरूर खचलेले नाहीत. ते त्याविरोधात उघडपणे लढण्यास तयार आहेत. व्ही.डी. सतीशन यांना चेकमेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या दौऱ्यासाठी सतीशन यांचा मतदारसंघ निवडला आहे. स्टेट प्रोफेशनल काँग्रेसने कोची येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात थरूर हे प्रमुख पाहुणे असतील. 3 डिसेंबर रोजी थरूर युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. थरूर यांनी त्यांच्या संपूर्ण दौऱ्यात पुनरुच्चार केला की ते आता जे काही करत आहेत ते पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आहे. त्यांच्या दौऱ्यात त्यांना भेट द्यायची ठिकाणे निवडण्यातही त्यांनी बारकाईने लक्ष घातले आहे. तिरुअनंतपुरम कॉर्पोरेशनच्या महापौरांच्या विरोधातील आंदोलनादरम्यान अटक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची त्यांनी तुरुंगात भेट घेतली.

केसी वेणुगोपाल यांच्यावर नेत्यांची नाराजी : जेष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांच्या नेतृत्वावरे राज्यातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्यावर राहुल गांधींवरचा आपला प्रभाव वापरून केरळमध्ये मनमानी काम केल्याचा आरोप आहे. थरूर हे दोनदा खासदार असूनही त्यांना संसदेत कोणतीही महत्त्वाची पदे मिळू नये यासाठी वेणुगोपाल यांनी प्रयत्न केले होते. 2019 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस जेव्हा विरोधी पक्षात बसली तेव्हा थरूर हे संसदीय पक्षाचे नेते बनतील अशी अनेकांना अपेक्षा होती. थरूर यांच्यासारख्या चांगल्या वक्त्याने सभागृहात पक्षाचे नेतृत्व करणे अपेक्षित असताना, थरूर यांच्याऐवजी अहीर रंजन चौधरी यांच्यासारख्या तुलनेने नगण्य नेत्याची निवड करण्यात आली. केरळमध्ये थरूर यांना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतही स्थान नाही. G-23 नेत्यांमध्ये, ज्यांत थरूर सुद्धा एक प्रमुख चेहरा होते, त्यांचे असे मत होते की, केसी वेणुगोपाल यांच्या संघटनात्मक कौशल्यांचा अभाव आणि हिंदी जनमानसाची माहिती नसणे ही राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या खराब कामगिरीची कारणे होती.

थरूर यांच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न : अशोक गेहलोत यांनी शर्यतीतून माघार घेतल्यावर पक्षाचे नेतृत्व त्यांना पक्षाध्यक्षपदासाठी पाठिंबा देईल अशी अपेक्षा थरूर यांना होती. मात्र, तेथेही त्याला बाजूला करण्यात आले. मात्र मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात या लढतीत थरूर यांना 1072 मते मिळवण्यात यश आल्यावर केसी वेणुगोपाल यांना मोठा धक्का बसला. केसी वेणुगोपाल यांनी व्हीडी सतीशनचा वापर करून थरूरचे प्रयत्न खोडून काढले, पण ते त्यांच्यावरंच उलटले आणि सतीशन पहिल्याच फेरीत बाद झाले. केरळमध्ये पक्षाचे नेतृत्व करण्याच्या पद्धतीत बदल इच्छिणाऱ्या पक्षाच्या कॅडरला सोबत घेऊन थरूर यांनी त्यांचा नियोजित राजकीय दौरा सुरू ठेवला.

थरूर यांना इतरांचा उघड पाठींबा : थरूर विरोधी टोळीला सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे IUML ने थरूर यांचे केलेले स्वागत. थरूर यांना आययूएमएलचे आयोजन करण्यास काँग्रेसने विरोध केला होता. पण UDF मधील दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाने काँग्रेस नेतृत्वाचा विरोध बाजूला सारून थरूर यांचे स्वागत केले. थरूर यांचा राष्ट्रीय स्तरावर योग्य वापर न केल्याबद्दल लीगची नेहमीच काँग्रेसविरुद्ध तक्रार होती. पाला बिशप यांनीही थरूर यांची भेट घेण्याचे मान्य केले आहे. ते कान्हिरापल्ली बिशप यांनाही भेटणार होते. त्यांनी कोझिकोडच्या दौऱ्यात थामरसेरी बिशप यांची भेट घेतली होती. थरूर यांची पक्षनेतृत्वावर वर्णी लागणे काँग्रेससाठी फायदेशीर ठरेल, असे मत थामरसेरी बिशप यांनी उघडपणे व्यक्त केले होते. काँग्रेसला आणखी एक धक्का बसला तो म्हणजे नायर सर्व्हिस सोसायटी (NSS) या पारंपारिक UDF सपोर्ट संस्थेने मन्नम मेमोरियल सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर थरूर यांचे स्वागत केले. एनएसएसचे सरचिटणीस सुकुमारन नायर यांनी अलीकडेच त्यांच्या मतदारसंघात विरोधी पक्षनेते व्हीडी सतीशन यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती हे विशेष.

राजकीय निरीक्षकांचे मते, जर थरूर यांच्याकडे केरळमध्ये काँग्रेसचे नेतृत्व सोपवले तर पक्षात जादुई परिवर्तन घडून येईल. तरुण, विद्यार्थी आणि व्यावसायिक जे एकतर पक्षाचे कार्यकर्ते किंवा पक्षाबद्दल सहानुभूती बाळगणारे आहेत, ते थरूर यांना नक्कीच भरगोस पाठिंबा देतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.