बरेली - जिल्ह्यात दोन वेगळ्या घटनांमध्ये धर्मांतर करून मुस्लीम महिलांनी हिंदू पुरुषांशी लग्न केले. या महिलांना आता पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पहिले प्रकरण बरेलीतील हाफिजगंज भागातील आहे, जिथे पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांना पोलीस स्टेशन बोलावले आणि गुन्हा नोंद न करता याविषयाचा तोडगा काढला. बहेडी जिल्ह्यातील दुसर्या प्रकरणात महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या हिंदू पतीविरूद्ध अपहरण आणि दरोडेखोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल नाही
एसएसपी रोहितसिंग सजवान यांनी पत्रकारांना सांगितले, "हाफिजगंज व बहेडी भागातील जोडपे प्रौढ आहेत. दोन्ही प्रकरणात आम्ही मुलीचे म्हणणे ऐकले. हाफिजगंज प्रकरणात या जोडप्याने पोलीस स्टेशन गाठले आणि सुरक्षेची मागणी केली. आम्ही दोघांच्या कुटुंबीयांना हा खटला मिटविण्यासाठी बोलविले. मुलीच्या कुटुंबीयांनी हे लग्न स्वीकारले आहे आणि कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही." गुरुवारी रितोरा भागातील एका मंदिरात त्यांचे लग्न झाले. या दाम्पत्याच्या समर्थनार्थ भगवा पक्षाचे सदस्यही पुढे आले.
व्हिडिओ प्रसिद् करत पालकांवर आरोप
बहेडी परिसरातील 29 वर्षीय मुस्लीम महिला मंगळवारी एका हिंदू पुरुषासह पळून गेली होती. धर्मांतर केल्यावर 4 सप्टेंबर रोजी मंदिरात लग्न केल्याचे सांगत तिने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. तिच्या पालकांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिने केला आहे. त्या महिलेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे, "जर माझ्या पतीला काही झाले तर माझ्या पालकांना जबाबदार धरावे."
पतीविरोधात तक्रार
बुधवारी तिच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीविरोधात अपहरण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केला. नवीन धर्मांतरविरोधी कायद्यातील तरतुदींनाही एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी या महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलिसांनी सांगितले, की हे जोडपे या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांना लवकरच दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाईल. एसएसपी म्हणाले, "दोन प्रौढ व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांच्या परस्पर संमतीशिवाय एकत्र राहण्याचा हक्क आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही पालन करीत आहोत.