ETV Bharat / bharat

Double Murder case: संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेने सासू-सासऱ्यांचीच केली हत्या, मित्रांसोबत रचला कट - दिल्ली दुहेरी हत्याकांड

ईशान्य दिल्लीतील गोकुळपुरी भागातील एका घरात वृद्ध जोडप्याच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे, तर आरोपी सुनेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

POLICE DISCLOSED SENIOR CITIZEN DOUBLE MURDER IN DELHI
संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेने सासू- सासऱ्यांचीच केली हत्या, मित्रांसोबत रचला कट
author img

By

Published : Apr 11, 2023, 3:16 PM IST

सुनेने सासू- सासऱ्यांचीच केली हत्या

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एका वृद्ध जोडप्याच्या हत्येचे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले आहे. सुनेनेच या वृद्ध दाम्पत्याचा खून केला होता. पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली आहे. ३० वर्षीय मोनिका असे आरोपीचे नाव आहे. सोमवारी सकाळी गोकुळपुरी पोलीस ठाण्याला भागीरथी विहारमध्ये दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळाली की, एका वृद्ध दाम्पत्याचा खून झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दुमजली घराच्या तळमजल्यावरील खोलीत ७५ वर्षीय राधेश्याम वर्मा आणि त्यांची पत्नी वीणा (६८) यांचे मृतदेह पडले होते.

पैसे दागिने झाले होते गायब : मृत व्यक्ती दिल्ली सरकारी शाळेत करोलबाग मॉडेल बस्ती येथून उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. तपासात घरातून साडेचार लाख रुपये आणि काही दागिने गायब झाल्याचे आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, मृताने प्रॉपर्टीचा सौदा केला होता. घराचा मागील भाग विकण्यासाठी 5 लाख रुपये आगाऊ रक्कम मिळाली होती. लुटमारीच्या उद्देशाने वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. तपासासाठी गुन्हे पथक आणि एफएसएल पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्यादरम्यान गुन्हे पथकाला जे काही पुरावे सापडले ते गोळा करण्यात आले. शेजारी लावलेले सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात आले आणि पोलिस तपासात पुढे गेल्यावर मारेकऱ्याच्या घरात मैत्रीपूर्ण प्रवेश झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी घरातील सर्व सदस्यांची चौकशी सुरू केली आणि त्यांचे मोबाईल तांत्रिक निगराणीवर ठेवले.

सासू आणि सासऱ्याची मित्राच्या मदतीने हत्या : चौकशीदरम्यान मोनिकाने उघड केले की, तिने सासू आणि सासऱ्याला एका मित्राच्या मदतीने मारले. मित्राने त्याच्या एका साथीदारासह हा खून केला आहे. आरोपी महिलेने सांगितले की, रविवारी संध्याकाळी 7 वाजता घरात कोणी नसताना तिने दोन्ही मारेकऱ्यांना बोलावून टेरेसवर लपवून ठेवले. रात्री सर्वजण झोपी गेल्यावर दोन्ही मारेकरी खोलीत घुसले आणि दोघांची हत्या करून घरात ठेवलेली रोकड व दागिने घेऊन पलायन केले.

खुनानंतर आरोपी सून करत होती नाटक : विशेष म्हणजे वृद्ध दाम्पत्याच्या हत्येनंतर पोलीस आणि आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी सून रडण्याचे नाटक करत होती. यासंबंधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये आरोपी रडत आहे आणि लोक तिचे सांत्वन करत आहेत. रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ती सासू आणि सासरे यांना दूध देण्यासाठी गेली होती, असेही ती सांगताना दिसत आहे. त्यावेळी दोघेही ठीक होते. व्हिडिओमध्ये तिने असेही सांगितले होते की, लग्नापूर्वी तिच्या पतीच्या मोठ्या भावाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता.

हेही वाचा: तामिळनाडूत होणार आरएसएसचे पथसंचलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.