ETV Bharat / bharat

वीटभट्टीच्या धुरानं 'काळवंडलं' चिमुकल्यांचं जीवन, 'या' पोलीस आयुक्तांच्या पुढाकारातून असं फुलत आहे शिकण्याचं स्वप्न

author img

By

Published : Mar 29, 2022, 4:40 PM IST

तिमायपल्ली येथील वीटभट्टीवरील मजुराच्या मुलांना मराठी शाळा नसल्याची बाब रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांना समजली. त्यामुळे महेश भागवत यांनी अॅडे अॅक्ट या सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेच्या मदतीनं या वीटभट्टीवर वस्तीशाळा सुरू करण्याचा निर्धार केला. अॅडे अॅक्ट या संस्थेचे तेलंगाणा के सुरेश यांच्या मदतीनं ही वस्तीशाळा सुरू केली.

police commissioner mahesh bhagwat launches marathi vastishala in telangana for children of brick kiln workers
पोलीस आयुक्त महेश भागवत

हैदराबाद - महाराष्ट्रातून तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातील वीट भट्टीवर काम करण्यासाठी अनेक मजूर महाराष्ट्रातून स्थलांतरीत झाले आहेत. या मजुरांच्या सोबत वीटभट्टीवर त्यांचे चिमुकले मुलंही काम करत असल्याचं विदारक चित्र उघड झालं आहे. तेलंगाणात या चिमुकल्यांना मराठी शिक्षणाची कोणतीही व्यवस्था नसल्यानं वीटभट्टीवरील मजुरांच्या अनेक पिढ्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ही बाब हेरुन पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी पुढाकार घेत सामाजिक संस्थेच्या मदतीनं या चिमुकल्यांना मराठीतून शिक्षण देणारी वस्तीशाळा सुरू केली आहे. त्यामुळे या चिमुकल्यांच्या आयुष्यात आता उजेड पेरला जात आहे.

वीटभट्टीवरील मजुरांच्या मुलांच्या शिक्षणात अशी होती भाषीक अडचण - महाराष्ट्रालगतच्या प्रदेशातून अनेक मजूर तेलंगाणामधील वीटभट्टीवर काम करण्यासाठी स्थलांतरीत झालेले आहेत. यातील काही मजूर हे तिमायपल्ली येथील बशीर शेख यांच्या वीटभट्टीवर काम करतात. या मजुरांची 30 मुलं या मजुरांच्यासोबत राहत होती. मात्र मराठी भाषीक मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था तेलंगाणात नाही. तेलंगाणातील सरकारी शाळेत तेलुगु भाषा शिकवली जाते. त्यामुळे मजुरांच्या मुलांना मराठी भाषेत शिकणं शक्य नव्हतं. त्यामुळे वीटभट्टीवरील अनेक पिढ्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या पुढाकारातून अशी सुरू झाली 'वस्तीशाळा' - तिमायपल्ली येथील वीटभट्टीवरील मजुराच्या मुलांना मराठी शाळा नसल्याची बाब रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांना समजली. त्यामुळे महेश भागवत यांनी अॅडे अॅक्ट या सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेच्या मदतीनं या वीटभट्टीवर वस्तीशाळा सुरू करण्याचा निर्धार केला. अॅडे अॅक्ट या संस्थेचे तेलंगाणा के सुरेश यांच्या मदतीनं ही वस्तीशाळा सुरू केली. या विटभट्टीच्या शेजारी असलेल्या सभागृहात ही वस्तीशाळा सुरू करण्यात आली. त्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या हस्ते करुन या मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यात आला.

मजुरांच्या 30 मुलांच्या शिक्षणाचा सुटला प्रश्न - तिमायपल्ली येथील वीटभट्टी परिसरात वस्तीशाळा सुरू करण्यात आली. वीटभट्टीच्या बाजुलाच असलेल्या समाजिक सभागृहात या मुलांसाठी वस्तीशाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेत शिकवण्यासाठी येथीलच एका मराठी महिला शिक्षिकेची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात आली आहे. ही शिक्षिका या 30 मुलांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शिकवत आहे. आता मराठी मुलांना शिकवण्यासाठी दोन शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे स्थलांतरीत मजुरांच्या या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सुटला आता आहे. या शाळेत शिकणारी ही मुलं आता आपल्या राज्यात जाऊनही आपलं शिक्षण सुरू ठेवणार आहेत.

मजुरांच्या मुलांचे सरकारी शाळेत करण्यात आले पुनर्वसन- वीटभट्टीवरील वस्तीशाळेत शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी मलकजगिरीचे जिल्हाधिकारी यांची मदत घेतली. जिल्हाधिकारी यांनी तिमायपल्ली येथील सरकारी शाळेत एक खोली उपलब्ध करुन दिली. आता या सरकारी शाळेत या मुलांना शिकवण्यात येत आहे. त्यामुळे या मुलांचे शिक्षण सुरू राहणार आहे.

उडीया मुलांसाठीही केली आहे शाळा सुरू- पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्या पुढाकारातून या अगोदर ओडिसा राज्यातील मजुरांच्या मुलांसाठीही शाळा सुरू करण्यात आली आहे. अॅडे अॅक्शन या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या संस्थेच्या मदतीनं महेश भागवत यांनी उडीया भाषेतील शाळा 2017 मध्ये सुरू केली आहे. या शाळेत मीड डे मीलही सुरू करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.