पुरी - सुप्रसिद्ध पुरीच्या श्री मंदिरावर अवैधरित्या ड्रोन उडवल्यामुळे पोलिसांनी पंश्चिम बंगालच्या यु ट्युबरला बेड्या ठोकल्या आहेत. अनिमेश चक्रबर्ती असे त्या पोलिसांनी अटक केलेल्या पश्चिम बंगालच्या यु ट्युबरचे नाव आहे. शहराच्या विशेष पथकाचे उपायुक्त के के परिप्रसाद यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस पथकाने अनिमेशला पश्चिम बंगालच्या बराकपोरे येथून पकडून आणण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मंदिरावर उडवला ड्रोन : अनिमेशने पुरीच्या सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरावर अवैधरित्या ड्रोन उडवले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीची शोधमोहीम सुरू केली होती. अखेर विशेष पथकाचे उपायुक्त के के परिप्रसाद यांच्या नेतृत्वात पोलिसांनी अनिमेशच्या मुसक्या आवळल्याची माहिती शहर पोलीस दलाचे अधिक्षकांनी ट्वि करुन दिली आहे.
मंदिरावर ड्रोन उडवल्याने खळबळ : पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर 3 डिसेंबरला ड्रोन उडत असल्याचे दिसून आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलीस दलाची चांगलीच भंबेरी उडाली. मंदिरावर ड्रोन उडत असल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल झाल्याने तर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. हा व्हिडिओ सोशल माध्यात व्हायरल झाला होता. तसाच तो युट्यूबवरही अपलोड करण्यात आला होता. तब्बल 5 मिनीट आणि 43 सेकंदाच्या या व्हिडिओत मंदिराच्या निलचक्र आणि सिंघद्वाराचे चित्रण करण्यात आल्याचे दिसत होते.
ओडीसा पोलिसांचेही मानले आभार : अनिमेश या यु ट्युबरने जगन्नाथ पुरी मंदिराच्या विविध भागाचे अवैधरित्या चित्रिकरण केले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. दरम्यान या व्हिडिओत अनिमेश या युट्युबरने ओडीसा पोलिसांचेही आभार मानले होते. त्यामुळे पोलिसांनीच तर त्याला मदत केली नाही ना, अशी शंका सोशल माध्यमातून व्यक्त करण्यात येत होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर पोलीस उपायुक्त के के हरिप्रसाद यांच्या नेतृत्वात पोलीस पथक पश्चिम बंगालमध्ये धडकले. त्यांनी अनिमेशच्या मुसक्या आवळून त्याला पुरीला आणले. पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा - Swati Maliwal Molested: दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्यासोबत छेडछाड.. कारने १५ मीटर ओढत नेले