चंपारण (बिहार) - PMC ( Punjab and Sindh Bank Scam ) च्या ४३५५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी दलजीत सिंग बल ( PMC Scam main accused Daljit Singh Bal ) याला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी भारत-नेपाळ सीमेवर असलेल्या रक्सौल सीमेवरून अटक केली आहे. दलजीत सिंग बल हा पीएमसी बँकेचा संचालक असून तो भारतीय सीमा ओलांडून नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.
आरोपी कॅनडाला पळून जाण्याच्या तयारीत -
पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी दलजीत सिंग बल हा बँकेचा संचालक होता. अंमलबजावणी संचालनालय (ED) या बँक घोटाळ्याची चौकशी करत आहे. या प्रकरणी अनेकांविरुद्ध चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दलजितसिंग बल हा फरार होता, त्याचा शोध सुरू होता. तपास यंत्रणांना चकमा देऊन दलजितसिंग बल फरार झाला होता. नीरव मोदी आणि विजय मल्ल्याप्रमाणे दलजितसिंग बलही देश सोडून नेपाळमार्गे कॅनडाला पळून जाण्याच्या तयारीत होता.
पीएमसी बँकेचे संचालक ताब्यात -
आरोपी महाराष्ट्रातून रक्सौल सीमेवर अगदी सहज पोहोचला. पण नेपाळमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 200 मीटर अंतरावर इमिग्रेशन विभागाने फरार पीएमसी बँकेचे संचालक दलजितसिंग बल याला ताब्यात घेतले. इमिग्रेशन विभागाने मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेला कळवले आहे. दलजित सिंग बल याला रक्सौल पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी कोणताही अधिकारी काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहे.
2019 मध्ये 4355 कोटींचा घोटाळा -
याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी पीएमसी घोटाळ्यात बँकेचे प्रमुख अधिकारी, लेखा परीक्षक आणि एचडीआयएलच्या प्रवर्तकांसह सात जणांना अटक करण्यात आली होती. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) ही अटक केली आहे. 2019 मध्ये 4355 कोटींचा घोटाळा झाला होता. EOW ( Economics Offenses Wing ) आता रक्सौलमध्ये पोहोचेल.
हेही वाचा - Neeraj Chopra Laureus Award : नीरज चोप्रा या पुरस्कारासाठी नामांकीत, दिली ही प्रतिक्रिया