म्हैसूर (कर्नाटक) - मसाज पार्लरवर पोलिसांनी धाड टाकून दोन जणांना अटक केली आहे. लॉकडाऊन सुरू असताना कोविड-१९ विषयक नियमांचे उल्लंघन करत हे मसाज सुरू होते. यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कर्नाटकमध्ये सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे म्हैसूरसह कर्नाटकमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना म्हैसूर शहरातील विजयनगर वॉटर टॅक परिसरात असलेल्या एका घरामध्ये मसाज पार्लर सुरू होते.
पोलिसांना या मसाज पार्लरविषयी माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी तिथे छापा टाकला आणि दोन जणांना अटक केली. यात एका तरुणीचा समावेश आहे. डीसीपी प्रकाश गौडा यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, मसाज पार्लर चालवणारा मुख्य आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी विजय नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - ख्रिश्चन धर्मगुरुंकडून कोरोनाचे उल्लंघन करत प्रार्थना; 100 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू
हेही वाचा - अधिकाऱ्यांना तुरुंगात ठेवल्याने दिल्लीत ऑक्सिजन येऊ शकत नाही- सर्वोच्च न्यायालय