ETV Bharat / bharat

Independence Day 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधणार

देशभरात आज चैतन्यमयी वातावरण आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आठव्या वर्षी देशाला स्वातंत्र्य दिनानिमित्त संबोधित करणार आहेत. सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रासह सर्व ऑलिंपिकपटू कार्यक्रमाचे विशेष पाहुणे आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्समधून अमृत आकारात पुष्पवृष्टी केली जाईल.

YOUNGMAN PROPOSED FOR LOVE, MARRIAGE AND CHEATED THROUGH TINDER APP
Independence Day 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधणार
author img

By

Published : Aug 15, 2021, 7:03 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन सलग आठव्या वर्षी देशाला स्वातंत्र्य दिनानिमित्त संबोधित करणार आहेत. यावर्षी पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिन सोहळ्यात, रतीय सैन्य दलाचे दोन एमआय-17 हेलिकॉप्टर अमृत आकारात पुष्प वृष्टी करतील. नरेंद्र मोदी आज आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत उपक्रमांवर जोर देण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ला येथे सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी मार्च 2021 मध्ये, गुजरातमधील साबरमती आश्रमातून ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अभियानाची’ सुरुवात केली होती. हा उत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणार आहे.

सकाळी पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन झाल्यावर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग,संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव डॉ अजय कुमार त्यांचे औपचारिक स्वागत करतील. त्यानंतर, संरक्षण सचिव पंतप्रधानांना दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग, लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा, एव्हीएसएम यांचा परिचय करुन देतील. त्यानंतर, जनरल ऑफिसर कमांडिंग पंतप्रधानांना सलामी तळाकडे घेऊन जातील. या ठिकाणी तिन्ही सैन्यदल प्रमुख आणि दिल्ली पोलिस गार्ड पंतप्रधानांना सलामी देतील. यानंतर, पंतप्रधान मानवंदना स्वीकारतील. पंतप्रधानांना मानवंदना देणाऱ्या पथकात, लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिस यांचा प्रत्येकी एक अधिकारी आणि 20 जवान या पथकात आहेत.

मानवंदना स्वीकारल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्याकडे प्रस्थान करतील. तिथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत,लष्कर प्रमुख एम एम नरवणे, नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग आणि हवाई दल प्रमुख आर के एस भदौरिया त्यांचे स्वागत करतील. दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग पंतप्रधानांना लाल किल्याच्या बुरुजावरील व्यासपीठापर्यंत घेऊन जातील. ध्वजारोहण झाल्यानंतर, राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामी दिली जाईल. ध्वजारोहण आणि सलामीच्या वेळी नौदलाचे 16 जवानांचे पथक राष्ट्रगीत धून वाजवतील. फ्टनंट कमांडर पी प्रियंवदा साहू पंतप्रधानांना राष्ट्रध्वज फडकवतांना सहाय्य करतील. त्याचवेळी, एलिट 2233 फील्ड बॅटरी पथकाचे बंदूकधारी बंदुकीच्या 21 फैरी झाडून राष्ट्रध्वजाला सलामी देतील.

ऑलिंपिकपटू कार्यक्रमाचे विशेष पाहुणे -

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार सुवर्णपदक विजेता भालाफेक पटू नीरज चोप्रा सह 32 ऑलिंपिक विजेते खेळाडू देखील सहभागी होणार आहेत. तसेच कोरोना लढ्यात अग्रणी राहून काम करणाऱ्या योध्यासाठी यावेळी किल्याच्या दक्षिण भागात वेगळी आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा - 75वा स्वातंत्र्यदिवस : देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवचेतनाचा संचार होवो; पंतप्रधानांकडून शुभेच्छा!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.