ETV Bharat / bharat

vaccination drive पंतप्रधान मोदींनी घेतली आढावा बैठक

पंतप्रधान कार्यालय़ाच्या माहितीनुसार गेल्या सहा दिवसांमध्ये ३७.७ दशलक्ष कोरोना लशींचा वापर करण्यात आले आहे. हे प्रमाण मलेशिया, सौदी अरेबिया आणि कॅनडा या देशांच्या एकूण लोकसंख्येहून अधिक आहे.

पंतप्रधान मोदी आढावा बैठक
पंतप्रधान मोदी आढावा बैठक
author img

By

Published : Jun 26, 2021, 10:31 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतत चिंता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखालील उच्चस्तरीय समितीची कोरोना लसीकरणाबाबत शनिवारी बैठक झाली. या समितीने देशातील कोरोना लसीकरणाची माहिती घेतली.

देशातील सर्व प्रौढांना वर्षाखेर लस देण्याचे लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांनी देशातील लसीकरणाची स्थिती जाणून गेतल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार गेल्या सहा दिवसांमध्ये ३७.७ दशलक्ष कोरोना लशींचा वापर करण्यात आले आहे. हे प्रमाण मलेशिया, सौदी अरेबिया आणि कॅनडा या देशांच्या एकूण लोकसंख्येहून अधिक आहे.

हेही वाचा-राकेश टिकैत यांना गाझियाबादमध्ये अटक केल्याचे वृत्त खोटे

लसीकरणाबाबत पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त-

देशातील १२८ जिल्ह्यांमध्ये ४५ वयोगटाहून अधिक नागरिकांचे ५० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाल्याची बैठकीत माहिती देण्यात आली आहे. तर १६ जिल्ह्यांमध्ये ४५ वयोगटाहून अधिक नागरिकांचे ९० लसीकरण झाल्याची माहिती देण्यात आली. या आठवड्यात लसीकरणाचा वेग वाढत असल्याने पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केल्याचे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. जास्तीत जास्त लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. लसीकरणाचा वेग वाढविण्याकरिता एनजीओ आणि इतर संस्थांनाही मोहिमेत सहभागी करण्याचे पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना सूचविले आहे.

हेही वाचा-भारताचा अभिमान : देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका कोचीत तयार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांना उपाययोजना करण्याचे केंद्राचे निर्देश

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियन्टने सरकारची चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ८ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना कंटेन्टमेंट क्षेत्र घोषित करणे, गर्दी टाळणे, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करणे व डेल्टा प्लस आढळलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे (एनसीडीसी) संचालक सुजीत सिंह म्हणाले, की महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचे २२ रुग्ण आढळले आहेत. तर तामिळनाडूमध्ये ९, मध्य प्रदेशमध्ये ७, केरळमध्ये ३, पंजाब आणि गुजरातमध्ये प्रत्येक दोन, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.