नवी दिल्ली - देशातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अधिक डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे. ही स्थिती पाहता वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट-पीजी) परीक्षा चार महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या इंटर्न डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करता येणार आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना अधिक मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी विविध निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बैठकीत घेतले आहेत. या बैठकीत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट-पीजी) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नीट-पीजी परीक्षा ऑगस्टपूर्वी होणार नाही. परीक्षेची तारीख एक महिना आधी जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा-फोन टॅपिंग प्रकरण : अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात धाव
सर्व इंटर्न डॉक्टरांना विमा कवच मिळणार
- इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोना रुग्णांची सेवा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- हे इंटर्न्स वरिष्ठांसोबत राहून कोरोना रुग्णांवर उपचार करणार आहेत.
- टेलिमेडिसीन तसेच सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी या डॉक्टर्सची मदत घेतली जाणार आहे.
- अशी १०० दिवसांची सेवा बजाविलेल्या इंटर्न डॉक्टरांना कोव्हिड नॅशनल सर्व्हिस सम्मान म्हणुन गौरविले जाणार आहे.
- त्यांना सरकारी नोकरी भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे.
- सर्व इंटर्न डॉक्टरांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे कोरोन योद्धा म्हणून विमा कवच मिळणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-ह्रदयद्रावक! बंगळुरूमध्ये स्मशानभूमीच्या बाहेर लागले 'हाऊस फुल'चे फलक
यापूर्वीही 15 एप्रिलला ढकलण्यात आली होती परीक्षा-
यापूर्वी ही परीक्षा 15 एप्रिल रोजी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मोहीम चालविली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगोदरच देशभरतील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (नीट) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होते.