नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. 'मन की बात' च्या कार्यक्रमातून मोदी जनतेच्या प्रश्नांची उत्तर देतात. यावेळी मोदींनी क्रिडा क्षेत्रातील काही प्रश्न देशवासियांना विचारले. तसेच त्यांनी 'रोड टू टोकियो' प्रश्नमंजुषेत स्पर्धेत नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपल्या संबोधनात मोदींनी फ्लाईंग सिख' मिल्खा सिंग यांना आंदराजली वाहिली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच मोदींनी कोरोना, जल संरक्षण ,राष्ट्रीय डॉक्टर दिन , India First आणि टोकियो ऑलिम्पिकवर भाष्य केले.
'मन की बात' मधील महत्त्वाचे मुद्दे -
- देशात बहुतेक खेळाडू खेड्यातून, लहान शहरातून येतात. टोकियोला जात असलेल्या ऑलिम्पिक गटात अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. ज्यांचे आयुष्य खूप प्रेरणादायी आहे. यावेळी मोदींनी महाराष्ट्रातील रहिवासी तिरंदाज प्रविण जाधवचे कौतूक केले. प्रवीण तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू असल्याचे मोदी म्हणाले.
- जीवनात कुठेही पोहोचलो, कोणतीही उंची प्राप्त केली. तरी मातीशी असलेले नातेच आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवते. टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे. अनेक वर्षांची मेहनत आहे. ते केवळ स्वतःसाठीच नाही. तर देशासाठी जात आहेत. खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आणि लोकांचे हृदयही जिंकायचे आहे. खुल्या मनानं खेळाडूंना पाठिंबा द्या, असे मोदी देशवासियांना म्हणाले. तसेच सामाजिक माध्यमांवर #cheer4India ह्या हॅशटॅग वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.
- कोरोनाविरूद्ध लढ्यात सर्वानी एकत्र येऊन अभूतपूर्व काम केले आहे. सरकारने देशात विनामूल्य लसीकरण उपलब्ध केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळेल, हे सुनिश्चित केले जात आहे, असे मोदी म्हणाले. तसेच गावा-गावात राबवण्यात येत असलेल्या लसीकरण अभियानावही भाष्य केले. निरंतरता, सातत्य हा निर्णायक सफलतेचा मंत्र आहे. अखंड प्रयत्न करत कोरोनावर विजय मिळवायचा आहे.
- पावसाचे पाणी जमिनीत मुरले तर भूगर्भातल्या पाण्याची पातळी सुधारते. म्हणूनच जल संरक्षण हे देश सेवेचेच एक रूप आहे, असे मोदी म्हणाले. त्यांनी उत्तराखंड मधल्या पौड़ी गढ़वाल इथले सच्चिदानंद भारती जी यांनी 30 हजार पेक्षा जास्त तलाव तयार केल्याचे मोदींनी सांगितले. तसेच पाण्याची बचत करण्याचे आवाहन मोदींनी जनतेला केले.
- 1 जुलैला आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. देशाचे थोर डॉक्टर बीसी राय यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपण सर्वजण त्यांचे आभारी आहोत. म्हणूनच यंदाचा राष्ट्रीय डॉक्टर दिन विशेष महत्वाचा आहे.
- India First हा आपला मंत्र असायला हवा. India First हा आपला प्रत्येक निर्णय, प्रत्येक निर्णयाचा आधार असला पाहिजे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या पर्वाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.