ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींनी केला तेजस्वी यादवांना फोन.. लालूंच्या प्रकृतीची केली विचारपूस

पीएम मोदींनी तेजस्वी यादव यांच्याशी संवाद साधला. फोनवर त्यांना लालू यादव यांच्या प्रकृतीची माहिती ( Narendra Modi Talk With Tejashwi Yadav ) घेतली. पीएम मोदींनी तेजस्वीला सांगितले की, आमची एकच इच्छा आहे की त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी..वाचा संपूर्ण बातमी..

lalu modi
पंतप्रधान मोदींनी केला तेजस्वी यादवांना फोन.. लालूंच्या प्रकृतीची केली विचारपूस
author img

By

Published : Jul 6, 2022, 7:48 AM IST

पाटणा : राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Narendra Modi Talk With Tejashwi Yadav ) आहे. खांद्याला फ्रॅक्चर झालेले आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. घरात पडल्याने त्यांच्या खांद्याचे हाड मोडले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी यादव यांना फोन करून राजद प्रमुख लालू यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी तेजस्वीला सांगितले की, आमची एकच इच्छा आहे की ते लवकरात लवकर बरे व्हावेत.

लालू यादव आयसीयूमध्ये दाखल : लालू प्रसाद यादव यापूर्वी पायऱ्यांवरून पडले होते. यानंतर त्यांच्या खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले. सध्या ते रुग्णालयात दाखल आहेत. तज्ज्ञांच्या मते, किडनीच्या रुग्णांसाठी दुखापती आणि फ्रॅक्चरवर उपचार करणे कठीण असते. उपचारादरम्यान एकाच वेळी अनेक अवयव निकामी होण्याचा धोका असतो. त्यामुळेच लालू यादव यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अत्यंत काळजी घेत आहेत. लालू यादव यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

  • ईश्वर से प्रार्थना है कि पूर्व मुख्यमंत्री लालू प्रसाद जल्द ठीक हो कर घर लौटें।
    राज्य सरकार को उनके स्वास्थ्य की चिंता करनी चाहिए और यदि आवश्यक हो, तो बेहतर इलाज के लिए उन्हें तुरंत दिल्ली भेजने की व्यवस्था की जानी चाहिए।

    — Sushil Kumar Modi (@SushilModi) July 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लालू यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा : पारस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.आसीफ रहमान यांनी लालू यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तब्येत सुधारण्याची चिन्हे आहेत. त्याला आता आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

वैद्यकीय अधीक्षक, पारस एचएमआरआय हॉस्पिटल पाटणा म्हणाले, "लालू प्रसाद यादव यांची आज सकाळी डॉक्टरांच्या एका पॅनेलने तपासणी केली. त्यांची प्रकृती स्थिर असून प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. अतिदक्षता विभागात त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे”- डॉ आसिफ, प्रवक्ते, पारस हॉस्पिटल

उपचारासाठी दिल्लीला जाण्याची शक्यता : प्रकृतीत सुधारणा न झाल्यास त्यांना दिल्लीला नेले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. मात्र, त्यांना दिल्लीला नेण्याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लालू यादव यांना पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रविवारी घरात पडले होते लालू : RJD सुप्रीमो रविवारी संध्याकाळी त्यांच्या घरातील जिन्यांवरून पडले होते. त्यामुळे त्यांच्या खांद्याचे हाड मोडले, तर कमरेलाही गंभीर दुखापत झाली. त्याला आधीच अनेक आजार आहेत. लालू यादव यांनाही किडनीचा गंभीर त्रास आहे. ते सध्या पत्नी राबडी देवी यांना दिलेल्या शासकीय निवासस्थानी राहतात.

हेही वाचा : lalu IN Presidential Election : लालू प्रसाद यादव राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.