ETV Bharat / bharat

'नव्या भारताचे नवे उड्डाण', चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान मोदींनी केले देशाचे अभिनंदन - पंतप्रधान मोदींनी देशाचे अभिनंदन केले

चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान मोदींनी देशाचे अभिनंदन केले. 'आम्ही नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार आहोत. नवा इतिहास लिहिला गेला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते सध्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.

PM Narendra Modi
नरेंद्र मोदी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 6:44 PM IST

Updated : Aug 23, 2023, 7:36 PM IST

बंगळुरू : चंद्रयान 3 चंद्रावर उतरल्याच्या ऐतिहासिक क्षणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशाचे अभिनंदन केले. विकसित भारतासाठी हे बिगुल आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी, चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगचे साक्षीदार होण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कनेक्ट झाले होते.

  • #WATCH | Johannesburg, South Africa | Immediately after the success of Chandrayaan-3, PM Narendra Modi telephoned ISRO chief S Somanath and congratulated him. pic.twitter.com/NZWCuxdiXw

    — ANI (@ANI) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आज नवा इतिहास लिहिला गेला : 'आम्ही नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार आहोत. आज नवा इतिहास लिहिला गेला आहे', असे नरेंद्र मोदी म्हणाले. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या अधिकृत दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी येथून जवळच इस्रोच्या टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC) येथे जमलेल्या शास्त्रज्ञांशी ऑनलाइन संवाद साधला.

राष्ट्रपतींनी अभिनंदन केले : इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांनी चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल चंद्रयान 3 चे अभिनंदन केले. 'मी खरोखर उत्साहित आहे. आम्ही या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. मी खूप आनंदी आहे', असे ते म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही इस्रोचे अभिनंदन केले. 'आज चंद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वी चंद्र लँडिंगमुळे आपल्या शास्त्रज्ञांनी केवळ इतिहासच नाही तर भूगोलाची कल्पनाही पुन्हा तयार केली आहे. हा खरोखरच एक महत्त्वाचा प्रसंग आहे', असे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

  • #WATCH पूर्व इसरो प्रमुख के सिवन ने इसरो के तीसरे चंद्र मिशन चंद्रयान-3 की चंद्रमा पर सफल लैंडिंग पर बधाई दी।

    उन्होंने कहा, "हम वास्तव में उत्साहित हैं...हम लंबे समय से इस पल का इंतजार कर रहे थे। मैं बहुत खुश हूं।" pic.twitter.com/hOCim8QI9o

    — ANI_HindiNews (@AHindinews) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेस मुख्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद साजरा : चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. 'मी या मिशनशी संबंधित सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत अवकाश क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. यातून 'आत्मनिर्भर भारत'चा मंत्र खरा ठरत आहे', असे नड्डा म्हणाले. यावेळी काँग्रेस मुख्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. 'आजच्या या पराक्रमासाठी टीम इस्रोचे अभिनंदन. चंद्रयान 3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग हे आपल्या वैज्ञानिक समुदायाच्या अनेक दशकांच्या प्रचंड कल्पकतेचे आणि कठोर परिश्रमाचे परिणाम आहे', असे राहुल गांधी म्हणाले.

  • Congratulations to Team ISRO for today's pioneering feat.#Chandrayaan3’s soft landing on the uncharted lunar South Pole is the result of decades of tremendous ingenuity and hard work by our scientific community.

    Since 1962, India’s space program has continued to scale new…

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांचे ट्विट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करत इस्रोचे अभिनंदन केले. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे. बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज हे देदिप्यमान, ऐतिहासिक यश मिळवले, असे मुख्यमंत्री म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला. चंद्रयान 3 हा भारताचा अंतराळातील सर्वात महत्वाचा प्रयत्न होता. याच्या यशाने वैज्ञानिक समुदायाला आत्मविश्वास दिला आहे. आपल्या देशासह संपूर्ण जगाला याचा अभिमान वाटेल. सर्व शास्त्रज्ञ आणि भारतीयांना हार्दिक शुभेच्छा, असे शरद पवार म्हणाले.

  • प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे...

    बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज हे देदिप्यमान, ऐतिहासिक यश मिळवलं आहे…

    ‘चंद्रयान ३’ मोहिमेमधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरले आणि या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला…

    या यशाने सर्व… pic.twitter.com/lMQ41GvVAT

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Chandrayaan 3 is India's most important attempt in space !!!
    Chandrayaan 3 success has given confidence to the scientific community & will make the whole world proud along with our country ! Best wishes to all the scientists & fellow Indians. May such innovative experiments of…

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. भारताची 'चंद्रक्रांती'! Chandrayaan 3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिग
  2. Chandrayaan 3 च्या लॅंडिंगसाठी अवघे काही तास बाकी, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं
  3. Chandrayaan 3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंगसाठी 'विक्रम'समोर अनेक आव्हानं, जाणून घ्या सविस्तर

Last Updated : Aug 23, 2023, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.