ETV Bharat / bharat

संसदेच्या सुरक्षेचा भंग अत्यंत गंभीर, विरोधकांनी वाद निर्माण करू नये - पंतप्रधान मोदी - संसद हल्ला

Parliament Attack : पंतप्रधान मोदींनी संसदेतील सुरक्षा भंगाची घटना अत्यंत चिंताजनक असल्याचं म्हटलंय. "लोकसभा अध्यक्ष या विषयाकडे पूर्ण गांभीर्यानं लक्ष देत आहे", असं ते म्हणाले.

Narendra Modi
Narendra Modi
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 3:38 PM IST

नवी दिल्ली Parliament Attack : संसदेच्या सुरक्षेचा भंग होणं ही अत्यंत गंभीर बाब असून विरोधकांनी या प्रकरणावरून वाद निर्माण करू नये, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मोदी म्हणाले की, तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असून यावर कठोर पावलं उचलले जातील. या हल्ल्यात सामील असलेल्या लोकांपर्यंत पोहचणं आणि त्यांचा हेतू जाणणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.

संसदेत घडलेली घटना गंभीर आहे : पंतप्रधान मोदींनी सुरक्षा भंगाची ही घटना चिंताजनक असल्याचं म्हटलंय. "यावर सर्वांनी मिळून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकानं अशा मुद्द्यांवर वादविवाद किंवा विरोध टाळावा. संसदेत घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे", असं ते म्हणाले. "लोकसभा अध्यक्ष या विषयाकडे पूर्ण गांभीर्यानं लक्ष देत आहे", असं त्यांनी स्पष्ट केलं.

शाह यांच्या राजीनाम्याची मागणी : १३ डिसेंबर रोजी लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती. विरोधी पक्ष गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी निवेदन देण्याची मागणी करत आहेत. तर काही नेत्यांनी शाह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. संसदेच्या संकुलाची सुरक्षा ही लोकसभा सचिवालयाची जबाबदारी आहे आणि ते सभापतींच्या सूचनेचं पालन करत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. भूतकाळातील अशा अनेक घटनांचा उल्लेख करत त्यांनी विरोधक यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला.

कलम ३७० वर काय म्हणाले मोदी : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भाजपानं तुलनेनं नवीन नेत्यांची निवड केली आहे. याबद्दल मोदींना विचारलं असता, "या नेत्यांकडे खूप अनुभव आहे आणि त्यांनी कठोर परिश्रम केले आहेत", असं ते म्हणाले. अनेक दशकांपासून माध्यमांचं लक्ष बहुतांशी काही कुटुंबांवरच केंद्रित झालंय. त्यामुळे नवीन लोकांच्या प्रतिभेवर कधी चर्चा होत नाही. हे दुर्दैवी आहे, असं पंतप्रधान म्हणाले. कलम ३७० वर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत मोदी म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयानंही हे कलम रद्द करण्यास मान्यता दिली. आता विश्वातील कोणतीही शक्ती ते परत आणू शकत नाही".

विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करावं : भाजपा नेतृत्वानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी माजी मुख्यमंत्री रमणसिंह, शिवराजसिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष करून विष्णू देव साई, मोहन यादव आणि भजनलाल शर्मा यांची निवड केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उत्कृष्ट कामगिरीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्ष पुन्हा ऐतिहासिक विजय मिळविण्यासाठी सज्ज असल्याचं यातून दिसून आलं. विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे वाचलंत का :

  1. शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्याकडून ऐका संसदेत पिवळा धूर सोडण्याच्या घटनेची पूर्ण कहाणी
  2. संसदेत घुसलेल्या तरुणांनी स्वतःला पेटवून देण्याची आखली होती योजना, चौकशीत धक्कादायक माहिती उघड
  3. "हे बेरोजगारी अन् महागाईमुळे झालं", संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरून राहुल गांधींची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.