नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांची ऐतिहासिक अशी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर पार पडली. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासह जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. ही बैठक साडेतीन तास चालली.
गुलाम नबी आझाद यांच्यासह जम्मू काश्मीरचे चार माजी मुख्यमंत्री व इतर नेते बैठकीला उपस्थित होते. सुत्राच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत सर्वांकडून सूचना जाणून घेतल्या आहेत. प्रत्येकाने प्रामाणिकपणे त्यांचे मते व्यक्त केल्याने पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. काश्मीरचे भवितव्य उज्जवल करण्यासाठी ही खुली चर्चा होती.
हेही वाचा-सैन्यदल होणार आणखी शक्तीशाली; 1,750 लढाऊ वाहनांसह ३५० टँकची करणार खरेदी
जम्मू आणि काश्मीर अपनी पार्टीचे अल्ताफ बुखारी म्हणाले, की ही चर्चा चांगल्या वातावरणात पार पडली. पंतप्रधानांनी सर्व नेत्यांचे विचार ऐकून घेतले. सीमानिर्धारण झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याचे पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले.
हेही वाचा-जगण्याची दुर्दम्यशक्ती; 105 वर्षांच्या राधिका देवींनी घेतली कोरोनाची लस
या आहेत प्रमुख मागण्या
काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधानांकडे ५ मागण्या केल्याचे सांगितले. राज्याचा दर्जा, विधानसभा निवडणुकीसह लोकशाहीचे पुनरुज्जीवन, काश्मीर पंडितांचे पुनर्वसन आणि सर्व राजकीय कैद्यांची मुक्तता आणि स्थानिक रहिवाशी नियम या मागण्या ठेवल्याचे आझाद यांनी सांगितले.
केंद्रातील नेत्यांची पहिल्यांदाच जम्मूमधील नेत्यांबरोबर बैठक
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रातील नेते व जम्मू आणि काश्मीरमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक झाली आहे. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा हा ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द केला होता.
हे नेते बैठकीला उपस्थित-
बैठकीला फारुख अब्दुल्ला, गुलाब नबी आझाद, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती हे जम्मू आणि काश्मीरचे चार माजी मुख्यमंत्रीदेखील बैठकीला उपस्थित राहिले आहेत. या बैठकीसाठी कोणताही अजेंडा जाहीर करण्यात आलेला नाही. जम्मू आणि काश्मीरमधील नेत्यांनी खुल्या मनाने बैठकीला उपस्थित राहत असल्याचे यापूर्वीच म्हटले आहे.