जैसलमेर (राजस्थान) - सीमेवरील जवान दिव्याप्रमाणे देशाला प्रज्वलित करत आहेत. तर सीमेवरील जवानांमुळे देशातील जवानांमध्ये आत्मविश्वास वाढत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच देशातील जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. विश्वासाच्या, आत्मविश्वासाच्या या संकल्पाला सिद्ध करण्यासाठी आपण सर्व सोबत येऊ या, असे आवाहनही त्यांनी जवांनाना केले. पंतप्रधान मोदींनी जैसलमेर एअरबेस येथील जवानांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
देशाच्या सीमेवर तसेच इतर ठिकाणी मोठे प्रकल्प पुर्ण करण्यात आले आहेत. अटल टनल त्याचेच उदाहरण असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. उत्तर-पूर्व भागात मोठे रस्ते तयार करण्यात आले. कोरोनाच्या महासंकटाच्या काळात देशाच्या सैन्यदलातील जवानांनी मन जिंकले आहे. आज देशात एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला जात आहे, तसेच डिफेन्स रिफॉर्म्सवरही लक्ष दिले जात आहे. आपल्या देशातील तिन्ही सैन्यदलांनी एक निर्णय केला की, देशातील सुरक्षा दलाशी निगडित साहित्य देशातच उत्पादित केले जाईल. त्यादिशेनेही काम सुरू आहे. सीमेवरील जवान दिव्याप्रमाणे देशाला प्रज्वलित करत आहेत. तर सीमेवरील जवानांमुळे देशातील जवानांमध्ये आत्मविश्वास वाढत आहे, असेही ते म्हणाले. देशातील जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. विश्वासाच्या, आत्मविश्वासाच्या या संकल्पाला सिद्ध करण्यासाठी आपण सर्व सोबत येऊया, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा - जैसलमेरमधील जवानांसोबत पंतप्रधान मोदींची दिवाळी; म्हणाले सैनिक आहेत म्हणून देशात सण-उत्सव होतात
देशाचा आत्मविश्वास वाढतोय
सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी आधीची प्रक्रिया सर्वात मोठी समस्या आहे. या प्रक्रिया सुलभ करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. तिन्ही सैन्यदलात समन्वय वाढावा, यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची व्यवस्था करण्यात आली. तसेच त्याचा अनुभव देखील येत आहे, असेही मोदी यांनी सांगितले. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन बोलताना मी, देशातील 100 हून ठिकाणी एनसीसी मधील युवांना जोडण्यात यावे, असे सांगितले होते. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. यातदेखील गर्ल्स कॅडेट यांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. आज वायुदल आणि नौदलामध्येही मोठ्या प्रमाणात महिलांना संधी दिली जात आहे. हे प्रयत्न देशाच्या आत्मविश्वासाला वाढवत आहेत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.