ETV Bharat / bharat

Pm Modi In Hyderabad : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'स्टैच्यू ऑफ इक्वालिटी'चे अनावरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैदराबाद दौऱ्यावर ( Pm Modi In Hyderabad ) आहेत. यावेळी ते 11 व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांच्या 'स्टैच्यू ऑफ इक्वालिटी' ( Statue of Equality ) च्या पुतळ्याचे ते अनावरण करणार आहेत. संत श्री रामानुजाचार्य ( Bhakti saint Sri Ramanujacharya ) यांचा हा पुतळा राष्ट्राला समर्पित केला जाणार आहे.

Pm Modi In Hyderabad
Pm Modi In Hyderabad
author img

By

Published : Feb 5, 2022, 9:51 AM IST

Updated : Feb 5, 2022, 12:15 PM IST

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैदराबाद दौऱ्यावर ( Pm Modi In Hyderabad ) आहेत. यावेळी ते 11 व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांच्या 'स्टैच्यू ऑफ इक्वालिटी' च्या ( Statue of Equality ) पुतळ्याचे ते अनावरण करणार आहेत. संत श्री रामानुजाचार्य ( Bhakti saint Sri Ramanujacharya ) यांचा हा पुतळा राष्ट्राला समर्पित केला जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी आईसीआरआईएसएटीच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील. तेलंगणाचे मुख्य सचिव सोमोश कुमार आणि पोलीस महानिरीक्षक एम महेंद्र रेड्डी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची माहिती घेत पहाणी केली.

पंतप्रधान कार्यलयाने सांगितल्यानुसार, पंतप्रधान मोदी 216 फुट उंच असलेल्या 'स्टैच्यू ऑफ इक्वेलिटी' या पुतळ्याचे अनावरण करतील. हा पुतळा 11 व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांचा आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त या पंचधातूंच्या मिश्रणापासून हा पुतळा बनलेला आहे. तसेच, येथे संत रामानुजाचार्य यांचे कार्यबाबतची प्राचीन ग्रंथ, थिएटर आणि एक शैक्षणिक दालन आहे.

दौऱ्यानिमित्त सुरक्षेत वाढ

पंतप्रधान मोदी दिल्लीहून बेगमपेट येथे विमानाने येतील. तेथून ते हेलिकॉप्टरने आईसीआरआईएसएटीच्या येथे पोहचत सुवर्ण महोत्सव सोहळ्यात सहभागी होतील. तेथे आईसीआरआईएसएटीच्या नवीन लोगेचे अनावरण करतील. त्यानंतर संत श्री रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याला रोखण्यात आल्याने पोलीस खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सुरक्षेसाठी 8000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा - Jammu Kashmir Terrorist Encounter : श्रीनगरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

Last Updated : Feb 5, 2022, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.