ETV Bharat / bharat

PM-Kisan Scheme: मोदींच्या हस्ते १९ हजार कोटी रुपयांचे हस्तांतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला आहे.पीएम किसान योजना अर्थात पंतप्रधान शेतकरी सन्मान नीधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या अंतर्गत वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.

PM-Kisan Scheme
किसान सन्मान निधी
author img

By

Published : Aug 9, 2021, 10:45 AM IST

Updated : Aug 9, 2021, 1:15 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत आज दुपारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या योजनेतल्या हप्त्याचे वितरण केले आहे. केंद्रीय कृषीमंत्रीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या योजनेद्वारे 19 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचं वितरण झाले असून त्याचा लाभ 9 कोटी 75 लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळाला आहे. या योजनेद्वारे शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 1 लाख 38 हजार कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे.

पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो.

पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग -

पंतप्रधान शेतकरी सन्मान नीधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. या योजनेचं वार्षिक बजेट हे 75 हजार कोटी रुपये इतकं आहे.

14 मे रोजी आठवा हप्ता दिला होता -

यापूर्वी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थ्यांना मे महिन्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी अर्थात 14 मे रोजी आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता. 9.5 कोटी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याच्या स्वरुपात 19000 कोटींची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आली होती.

हेही वाचा - Golden Boy Neeraj Chopra : सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने दिली 'ही' प्रतिक्रिया

Last Updated : Aug 9, 2021, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.