ETV Bharat / bharat

मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद, परीक्षेला जगण्या-मरण्याचा प्रश्न समजू नका - परिक्षा पे चर्चा

मोदी
मोदी
author img

By

Published : Apr 7, 2021, 7:40 PM IST

Updated : Apr 7, 2021, 8:37 PM IST

20:36 April 07

कोरोनाकाळात आपण बऱ्याच गोष्टी गमावल्या आहेत. मात्र, या संकटातून आपल्या बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळाल्या. आपण आपल्या कुटुंबाच्या जवळ आलो. नातेसंबंध आणखी घट्ट झाले, असे मोदी म्हणाले.

20:36 April 07

स्वप्न पाहावीत. स्वप्न पाहणे चांगली गोष्ट आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करावी. फक्त झोपेत स्वप्न पाहू नये. आयुष्याची ध्येय ठरवा. त्या दिशेने काम करा. वेगळ्या वाटा निवडा, असे मोदी विद्यार्थ्यांना म्हणाले.

19:54 April 07

कठीण वाटणाऱ्या गोष्टी शिका

पंतप्रधान झाल्यानंतर मी बरेच वाचनही केले. प्रत्येकाने बरेच काही शिकले पाहिजे. ज्या गोष्टी मला शिकण्यास कठिण वाटतात. त्या पहिल्यांदा शिकण्याचा मी प्रयत्न करतो.  

19:53 April 07

यशस्वी असणार लोकांना सर्वच येत नाही - मोदी

काही विषय कठिण वाटतात. मात्र, त्यामुळे तुमच्यामध्ये काही कमी आहे असे नाही. आयुष्यात खूप यशस्वी असणार लोकांना सर्वच येत नाही. मात्र, ते एका विषयात निपुण असतात. त्यांची एका विषयावर प्रचंड पकड असते.

19:46 April 07

विद्यार्थ्यांनी सर्व विषयामध्ये पारंगत व्हावे आणि तसेच रिकाम्या वेळेत आपल्या ज्ञानात भर घालावी - मोदी

19:46 April 07

परीक्षा ही सर्वकाही नाही - मोदी

परीक्षा सर्व काही आहे, असे वातावरण तुमच्या आजूबाजूला बनले आहे. मात्र, परीक्षा ही सर्वकाही नाही. आयुष्यातील हा शेवटचा टप्पा नाही. परिक्षेला घाबरण्याचे काम नाही, असे मोदी म्हणाले. 

19:38 April 07

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांना समान वेळ द्यावा - पंतप्रधान मोदी

19:38 April 07

विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना तणाव मुक्त कराव - मोदी

19:38 April 07

विद्यार्थ्यांनी परिक्षेचा तणाव घेऊ नये - मोदी

19:36 April 07

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, की तुम्ही सर्वजण परीक्षेची तयारी करीत आहात. कोरोनामुळे यावेळी आपण व्हर्चुअली संवाद साधत आहोत. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील आनंद पाहता येणार नाही. हे माझ्यासाठी एक प्रकारचे नुकसान आहे. 

19:24 April 07

मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद, परीक्षेला जगण्या-मरण्याचा प्रश्न समजू नका

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र  मोदी वर्ष 2018 पासून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. पहिल्यांदाच दिल्लीतील  स्टेडियममध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते दरवर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि परीक्षेचा ताणतणाव दूर करण्याचा मार्ग सुचवितात. गेल्या वर्षी हा कार्यक्रम दिल्लीतील तालकटोरा मैदानात पार पडला होता. 

Last Updated : Apr 7, 2021, 8:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.