ETV Bharat / bharat

खर्च 127 कोटी, 200 रोबो; पाहा अहमदाबादमधील रोबोटिक्स गॅलरी - Ahmedabad Science City

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज(16 जुलै) गुजरात सायन्स सिटीमधल्या अॅक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरी, 'रुद्राक्ष' आंतराराष्ट्रीय सहयोग संमेलन केंद्र आणि नेचर पार्कचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

robotics gallery Ahmedabad
अहमदाबादमधील रोबोटिक्स गॅलरी
author img

By

Published : Jul 16, 2021, 4:27 PM IST

अहमदाबाद(गुजरात) - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज(16 जुलै) गुजरात सायन्स सिटीमधल्या अॅक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरी, 'रुद्राक्ष' आंतराराष्ट्रीय सहयोग संमेलन केंद्र आणि नेचर पार्कचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तब्बल 127 कोटी रुपये खर्च करून ही रोबोटिक्स गॅलरी अहमदाबाद येथे तयार करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये 79 प्रकारचे 200 रोबो ठेवण्यात आले आहेत. तसेच ही गॅलरी 11 हजार स्क्वेअर मीटरमध्ये बनवली आहे.

robotics gallery Ahmedabad
अहमदाबादमधील रोबोटिक्स गॅलरी

अॅक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरी

अॅक्वेटिक्स गॅलरीमध्ये महत्वाचे शार्क मासे राहणार आहेत. अद्भुत अनुभव देणारा 28 मीटरचा बोगदाही या गॅलरीमध्ये पाहायला मिळणार आहे.

robotics gallery Ahmedabad
अहमदाबादमधील रोबोटिक्स गॅलरी

रोबोटिक्स गॅलरी ही रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे दर्शन घडवणारी आहे. मानवासारखा रोबो या रोबोटिक्स गॅलरीत पाहायला मिळणार आहे. औषध, कृषी, अंतराळ, संरक्षण क्षेत्रासह आणि दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणारे असे रोबो या गॅलरीत आहेत.

robotics gallery Ahmedabad
अहमदाबादमधील रोबोटिक्स गॅलरी

रोबोटिक्स गॅलरी ही रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा विकास दर्शविणारी एक संवादात्मक गॅलरी आहे, ती लोकांना रोबोटिक्सच्या वाढत्या क्षेत्राला परिचित करेल.

robotics gallery Ahmedabad
अहमदाबादमधील रोबोटिक्स गॅलरी

गॅलरीच्या एन्ट्री गेटवर रोबोटिक शिल्पही बनवले आहे. या गॅलरीमधील एक अद्वितीय आकर्षण म्हणजे येथील रिसेप्शनजवळ ह्युमनॉइड रोबोट ठेवला असून, तो आनंद, आश्चर्य आणि उत्साह यासारख्या भावना व्यक्त करू शकतो. त्यामुळे रोबोटिक्स गॅलरी एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.