ETV Bharat / bharat

Shivamogga Airport Inauguration : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या अत्याधुनिक शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटकातील शिवमोग्गा येथील अत्याधुनिक विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. सर्वात मोठी एअर ट्रॅफिक कंट्रोलर इमारत असलेले हे कर्नाटक राज्यातील एकमेव विमानतळ आहे. उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान मोदी विमानतळाच्या नावाची देखील घोषणा करतील.

author img

By

Published : Feb 26, 2023, 2:29 PM IST

Shivamogga Airport
शिवमोग्गा विमानतळ

शिवमोग्गा (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ फेब्रुवारीला कर्नाटकला भेट देणार आहेत. तेथे ते शिवमोग्गा येथील विमानतळ आणि इतर अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान शिवमोग्गामधील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. स्मार्ट सिटी प्रकल्प, रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान बेळगाव जिल्ह्यालाही भेट देतील. ते पीएम - किसानचा 13 वा हप्ता देखील जारी करतील.

Shivamogga Airport
शिवमोग्गा विमानतळ

मोदी विमानतळाच्या नावाची घोषणा करतील : फेज - 1 बांधकामाची पायाभरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते 20 जून 2008 रोजी करण्यात आली होती. 21 डिसेंबर 2010 रोजी पूरक विकास करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. शिवमोग्गा येथील विमानतळ हे येडियुरप्पा यांचे स्वप्न आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी विमानतळ बांधण्याचा निर्णय घेतला आणि जमिनीचे अधिग्रहण केले. शिवमोग्गा विमानतळाला आपले नाव देण्याचा प्रस्ताव नम्रपणे नाकारणाऱ्या येडियुरप्पा यांनी विमानतळाला कवी कुवेंपू यांचे नाव सुचवले आहे. उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान मोदी विमानतळाच्या नावाची घोषणा करतील.

Shivamogga Airport
शिवमोग्गा विमानतळ

बेंगळुरूनंतरची दुसरी सर्वात मोठी धावपट्टी : शिवमोगा तालुक्यातील सोगणे गावाच्या परिसरात नवीन विमानतळ बांधण्यात आले आहे. सुमारे 449.22 कोटी रुपये खर्चून एकूण 775 एकर क्षेत्रावर हे विमानतळ बांधले गेले आहे. ATR 72 ते Air Bus 320 पर्यंत सर्व प्रकारची उड्डाणे रात्रंदिवस हाताळण्यासाठी या विमानतळाची निर्मिती करण्यात आली आहे. या विमानतळावर 3.2 किमीची धावपट्टी आहे. बेंगळुरूनंतर ही दुसरी सर्वात मोठी धावपट्टी आहे. ते 3,050 मीटर लांब आणि 45 मीटर रुंद आहे. देशातील सर्वात मोठे विमान एअर बस 320 या धावपट्टीवर उतरवता येणार आहे.

Shivamogga Airport
शिवमोग्गा विमानतळ

विमानतळाचे डिझाईन : विमानतळाला समोरच्या बाजूला कमळाच्या फुलाचा आणि मागच्या बाजूला गरुडाचा आकार आहे. टर्मिनल इमारत 106 मीटर लांब आणि 66 मीटर रुंद आहे. ते टॉवरच्या रूपात आहे. टर्मिनलचे उजवे आणि डावे टोक 9 मीटर उंच आहेत. केंद्र 20 मीटर उंच आहे. टर्मिनल 74 खांबांनी बांधले आहे. टर्मिनलमध्ये 6 चेक-इन काउंटर आहेत. व्हीआयपींसाठी दोन स्वतंत्र चेक-इन काउंटर आहेत आणि उर्वरित चार सामान्य चेक-इन काउंटर आहेत. येथे एक कॅन्टीन आणि दोन स्नॅक बार आहेत. टर्मिनलमध्ये चाइल्ड केअर, डॉक्टर्स, एअरलाइन ऑफिस, लॉस्ट अँड फाईन आणि स्टाफ अशा 35 खोल्या आहेत.

एअर ट्रॅफिक कंट्रोलरची सुविधा : शिवमोग्गा विमानतळ टर्मिनलचे बांधकाम हैदराबाद येथील के. एम. वरदाप्रसाद राव प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने केले आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार, बेंगळुरू व्यतिरिक्त, फक्त शिवमोग्गा येथे मोठ्या टर्मिनलसह पायाभूत सुविधा असलेले टर्मिनल आहे. सर्वात मोठी एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोलर) इमारत असलेले हे कर्नाटक राज्यातील एकमेव विमानतळ आहे. विमानतळाच्या आजूबाजूला एक कंपाऊंड बांधण्यात आला आहे, ज्यामध्ये नियुक्त ठिकाणी वॉच टॉवर लावण्यात आला आहे.

सध्या फक्त दिवसांची उड्डाणे : शिवमोग्गा विमानतळ हे राज्य सरकारच्या अखत्यारीत काम करणारे एकमेव विमानतळ असेल. बेंगळुरूसह राज्यातील इतर विमानतळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या व्यवस्थापनाखाली आहेत. यासाठी स्वतंत्र संचालक आणि तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाची ७३७ आणि आयएन ७६ विमाने आधीच विमानतळावर उतरली आहेत. आत्तापर्यंत केवळ दिवसा उड्डाणांची व्यवस्था सुरु झाली आहे. येत्या काही दिवसांत रात्रीच्या विमानांचीही व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे. विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर 3-4 महिन्यांत रात्रीची उड्डाणे सुरू होतील.

हेही वाचा : PM Modi in Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाचे केले कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.