ETV Bharat / bharat

PM Narendra Modi : महाराष्ट्रानंतर मोदींचे 'मिशन तेलंगणा'.. हैदराबादमध्ये आज 'विजय संकल्प सभे'चे आयोजन - PM Narendra Modi Vijay Sankalp Sabha

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर भाजपने आता तेलंगणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असून, पंतप्रधान मोदींनी त्यांचे 'मिशन तेलंगणा' सुरु केले ( Telangana Assmebly Election 2023 ) आहे. त्याचाच एक भाग म्हणून हैदराबादमध्ये ( secunderabad Pared Ground ) आज विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले ( PM Narendra Modi Vijay Sankalp Sabha ) आहे.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jul 3, 2022, 9:58 AM IST

हैदराबाद ( तेलंगणा ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिकंदराबाद येथील परेड मैदानावर ( secunderabad Pared Ground ) 'विजय संकल्प सभा' ​​या जाहीर सभेला संबोधित करणार ( PM Narendra Modi Vijay Sankalp Sabha ) आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी तेलंगणातील २०२३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ( Telangana Assmebly Election 2023 ) बिगुल वाजवणार आहेत.

घराणेशाही मोठा शत्रू : भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी शनिवारी येथे दाखल झालेले मोदी रविवारी संध्याकाळी रॅलीला संबोधित करतील. 26 मे रोजी हैदराबादमध्ये मोदींनी अप्रत्यक्षपणे टीआरएस पक्षाचा उल्लेख करत कौटुंबिक राजकारणावर टीका केली की, घराणेशाही हा लोकशाहीचा "सर्वात मोठा शत्रू" आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यात सत्तांतर करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

राजकीय विश्लेषकांच्या मते, मोदी हे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि सत्ताधारी टीआरएस यांच्या विरोधात आपली टीका सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे. KCR या नावाने प्रसिद्ध असलेल्या राव यांनी शनिवारी विरोधी पक्षांचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या पक्षाच्या बैठकीत मोदींवर टीका केली आणि रविवारी मोदींनी त्यांच्या जाहीर सभेत "लोकांनी" उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी मागणी केली.

३ हजार पोलीस कर्मचारी तैनात : हैदराबादचे पोलिस आयुक्त सी व्ही आनंद यांनी शुक्रवारी सांगितले की, सभेसाठी विशेष पोलिस, ग्रेहाऊंड आणि ऑक्टोपससह 3,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जातील. ते म्हणाले की कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि हैदराबाद नागरी संस्थेच्या अधिकार्‍यांनी सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रानंतर आता भाजपचे पुढचे टार्गेट ठरले.. 'या' राज्यात सत्ता आणण्यासाठी तयारी.. मोदींचा आज दौरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.