नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) मन की बात ( Mann Ki Baat ) कार्यक्रमाच्या माध्यमातून महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातील जनतेशी 11 वाजता संवाद साधतात. मात्र, आज त्यांनी 11.30 वाजता जनतेला संबोधित केले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त त्यांनी अभिवादन केलं. तसेच, 30 जानेवारी हा दिवस बापूंच्या विचारांची शिकवण देतो, असे पंतप्रधान मोदी यांनी ( Pm Modi On Mahatma Gandhi ) सांगितले.
मन की बात मध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आज महात्मा गांधी म्हणजे बापूंची पुण्यतिथी आहे. 30 जानेवारी हा दिवस बापूंच्या विचारांची शिकवण देतो. आता आपण स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. यावेळी राजपथावर झालेल्या चित्ररथाच्या रॅलीत आपल्या देशाचे शौर्य आणि सामर्थ्य दिसून आले. इंडिया गेटजवळ ‘अमर जवान ज्योति’ आणि जवळच असलेल्या 'नॅशनल मेमोरिअल वॉर' मधील प्रज्ज्वलित ज्योतींचे विलनीकरण करण्यात आले आहे. यामुळे अनेक देशवासीयांच्या आणि शहीद कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू आले. इंडिया गेटवर नेताजींचा डिजिटल पुतळा बसवण्यात आला आहे," असेही त्यांनी सांगितले.
"अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये देशातील अनेकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. यातील एक म्हणजे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार. लहान वयात धाडसी आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या मुलांना हा पुरस्कार देण्यात आला. तसेच, देशात नुकतेच पद्म पुरस्कार जाहीर झाले. पद्म पुरस्कार मिळणाऱ्यापैकी अशी काही नावे आहेत, ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हे आपल्या देशातील पडद्या मागील हिरो आहेत, ज्यांनी कठीण परिस्थितीत असामान्य गोष्टी केल्याचेही," पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
त्याची झलक कॉलरवाली' वाघिणीच्या....
प्रत्येक सजीवासाठी सहानुभूती ही आपल्या संस्कृतीत आणि जन्मजात स्वभावात आहे. त्याची झलक 'कॉलरवाली' वाघिणीच्या अंतिम संस्कारात दिसली. मध्य प्रदेशमध्ये आदराने व आपुलकीने तिच्यावर आदराने व आपुलकीने ते अंत संस्कार पार पडले, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.