ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद - पंतप्रधान मोदी मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांशी सवांद साधणार

राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील २२ दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात ठिय्या आंदोलन सुरू आहे. तिन्ही कायदे सरकारने आधी रद्द करावे, त्यानंतरच चर्चा करू, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 17, 2020, 3:50 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी उद्या (शुक्रवार) मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे मोदी शेतकरी संमेलनात सहभागी होणार आहेत. राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील २२ दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात ठिय्या आंदोलन सुरू आहे. तिन्ही कायदे सरकारने आधी रद्द करावे, त्यानंतरच चर्चा करू, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकऱ्यांशी काय बोलतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

गुजरातमध्ये विरोधकांवर केली टीका -

नुकतेच गुजरात येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यास गेले असता पंतप्रधान मोदींनी शेतकरी आंदोलनावर वक्तव्य केले होते. नव्या कृषी कायद्यांवर विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मोदींनी केला होता. शेतकऱ्यांच्या मागे राहून विरोधक सरकारवर हल्ला करतायेत. कृषी क्षेत्रातील या सुधारणा विरोधकांनाही करायच्या होत्या मात्र, त्यांना सत्तेत असताना ते जमले नाही. भाजपने सुधारणा करून दाखविल्या, असे मोदी म्हणाले. कच्छमधील शेतकऱ्यांच्या पंतप्रधानांनी समस्या जाणून घेतल्या होत्या तसेच त्यांच्याशी चर्चा केली होती.

सिंघू सीमेवर शेतकऱ्यांचा ठिय्या -

दिल्लीच्या सिंघू सीमेवर हजारो शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. पंजाब, हरयाणासह विविध राज्यातील शेतकरी सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. बरोबर येताना शेतकऱ्यांनी सुमारे सहा महिन्यांचे राशन बरोबर आणले आहे. त्यामुळे सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

'दिल्ली चलो' आंदोलनाचा 22 वा दिवस -

केंद्रातील कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 22 वा दिवस आहे. याप्ररकरणी अद्याप कोणताही तोडगा समोर आला नसून, आता सर्वोच्च न्यायालयानेही याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. सरकारने याप्रकरणी समिती स्थापन करुन, तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा असे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आज या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.