ETV Bharat / bharat

मोदींनी बायडेन यांच्या बरोबर साधला संवाद; कोरोना आणि परस्पर सहकार्याबाबत केली चर्चा

author img

By

Published : Nov 18, 2020, 6:45 AM IST

Updated : Nov 18, 2020, 6:53 AM IST

मोदींनी बायडेनना फोन करत विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच, भारत-अमेरिका संबंधांबाबत आणि कोरोना महामारीबाबतही चर्चा केली. बायडेन यांच्या विजयानंतर पहिल्यांदाच या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

PM Modi speaks to  Biden, discusses cooperation, pandemic
मोदींनी बायडेनशी साधला संवाद; कोरोना आणि सहकार्याबाबत केली चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेल्या जो बायडेन यांच्यासोबत संवाद साधला. मोदींनी त्यांना फोन करत विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच भारत-अमेरिका संबंधांबाबत आणि कोरोना महामारीबाबतही चर्चा केली. बायडेन यांच्या विजयानंतर पहिल्यांदाच या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

  • Spoke to US President-elect @JoeBiden on phone to congratulate him. We reiterated our firm commitment to the Indo-US strategic partnership and discussed our shared priorities and concerns - Covid-19 pandemic, climate change, and cooperation in the Indo-Pacific Region.

    — Narendra Modi (@narendramodi) November 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कमला हॅरिस यांचेही केले अभिनंदन..

यासोबतच, पंतप्रधानांनी यावेळी कमला हॅरिस यांचेही अभिनंदन केले. "भारतीय-अमेरिकी लोकांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. अमेरिका आणि भारतातील संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे" अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

  • I also conveyed warm congratulations for VP-elect @KamalaHarris. Her success is a matter of great pride and inspiration for members of the vibrant Indian-American community, who are a tremendous source of strength for Indo-US relations.

    — Narendra Modi (@narendramodi) November 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="

I also conveyed warm congratulations for VP-elect @KamalaHarris. Her success is a matter of great pride and inspiration for members of the vibrant Indian-American community, who are a tremendous source of strength for Indo-US relations.

— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2020 ">

जुन्या आठवणींना उजाळा..

यावेळी बोलताना मोदी यांनी २०१४ आणि २०१६ मधील आठवणींना उजाळा दिला. २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींच्या पहिल्या अमेरिका दौऱ्यामध्ये बायडेन यांनी मोदींना दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित केले होते. तसेच, २०१६ मध्ये मोदी जेव्हा अमेरिकेच्या काँग्रेसला संबोधित करत होते, तेव्हा बायडेन तेथील अध्यक्षस्थानी होते. अमेरिकेतील भारतीय राजदूताने ही माहिती दिली.

भारत अमेरिका संबंध मजबूत होतील

बायडेन यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले होते. बायडेन उपाध्यक्ष असताना भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले काम हे अतुलनीय असल्याचे मोदींनी म्हटले होते. तसेच, आता बायडेन आणि कमला यांच्या कार्यकाळात हे संबंध अधिक बळकट होतील असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला होता.

हेही वाचा : कोविड-19 मुळे द्वितीय विश्वयुद्धाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात नवीन प्रोटोकॉल विकसित करण्याची संधी - मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेल्या जो बायडेन यांच्यासोबत संवाद साधला. मोदींनी त्यांना फोन करत विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच भारत-अमेरिका संबंधांबाबत आणि कोरोना महामारीबाबतही चर्चा केली. बायडेन यांच्या विजयानंतर पहिल्यांदाच या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

  • Spoke to US President-elect @JoeBiden on phone to congratulate him. We reiterated our firm commitment to the Indo-US strategic partnership and discussed our shared priorities and concerns - Covid-19 pandemic, climate change, and cooperation in the Indo-Pacific Region.

    — Narendra Modi (@narendramodi) November 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कमला हॅरिस यांचेही केले अभिनंदन..

यासोबतच, पंतप्रधानांनी यावेळी कमला हॅरिस यांचेही अभिनंदन केले. "भारतीय-अमेरिकी लोकांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. अमेरिका आणि भारतातील संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे" अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

  • I also conveyed warm congratulations for VP-elect @KamalaHarris. Her success is a matter of great pride and inspiration for members of the vibrant Indian-American community, who are a tremendous source of strength for Indo-US relations.

    — Narendra Modi (@narendramodi) November 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जुन्या आठवणींना उजाळा..

यावेळी बोलताना मोदी यांनी २०१४ आणि २०१६ मधील आठवणींना उजाळा दिला. २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींच्या पहिल्या अमेरिका दौऱ्यामध्ये बायडेन यांनी मोदींना दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित केले होते. तसेच, २०१६ मध्ये मोदी जेव्हा अमेरिकेच्या काँग्रेसला संबोधित करत होते, तेव्हा बायडेन तेथील अध्यक्षस्थानी होते. अमेरिकेतील भारतीय राजदूताने ही माहिती दिली.

भारत अमेरिका संबंध मजबूत होतील

बायडेन यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले होते. बायडेन उपाध्यक्ष असताना भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले काम हे अतुलनीय असल्याचे मोदींनी म्हटले होते. तसेच, आता बायडेन आणि कमला यांच्या कार्यकाळात हे संबंध अधिक बळकट होतील असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला होता.

हेही वाचा : कोविड-19 मुळे द्वितीय विश्वयुद्धाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात नवीन प्रोटोकॉल विकसित करण्याची संधी - मोदी

Last Updated : Nov 18, 2020, 6:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.