हैदराबाद: सर्व घराणेशाही पक्षांचा पाया भ्रष्टाचारात आहे. घराणेशाही असलेल्या काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार संपूर्ण देशाने पाहिला आहे. संपूर्ण तेलंगणा राज्यात बीआरएसने भ्रष्टाचाराची पातळी गाठली आहे. बीआरएस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष तेलंगणासाठी धोकादायक आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते वारंगल येथील एका सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वारंगलमध्ये 6,100 कोटी रुपयांच्या अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. कार्यक्रमांमध्ये सामील होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी प्रसिद्ध भद्रकाली मंदिराला भेट दिली.
पंतप्रधान मोदींचा या वर्षातील तेलंगणाचा तिसरा दौरा आहे. यापूर्वी ते जानेवारी आणि एप्रिलमध्ये तेलंगणात आले होते. भाजप पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राज्य युनिटचे नवनियुक्त अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हे पंतप्रधानांच्या कार्यक्रमांच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांसह वरंगलला रवाना झाले. 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या काझीपेट या रेल्वे वॅगन उत्पादन युनिटची पायाभरणी करणार आहेत. या आधुनिक उत्पादन युनिटमध्ये प्रगत वॅगन उत्पादन क्षमता असणार आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार निर्मितीला मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
-
#WATCH | "...The foundation of all these dynastic parties has its roots in corruption, dynastic Congress party's corruption was witnessed by the whole country, and the whole of Telangana is seeing the level of corruption in the state by BRS...both BRS & Congress are dangerous… pic.twitter.com/Mwh7ua6bKp
— ANI (@ANI) July 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | "...The foundation of all these dynastic parties has its roots in corruption, dynastic Congress party's corruption was witnessed by the whole country, and the whole of Telangana is seeing the level of corruption in the state by BRS...both BRS & Congress are dangerous… pic.twitter.com/Mwh7ua6bKp
— ANI (@ANI) July 8, 2023#WATCH | "...The foundation of all these dynastic parties has its roots in corruption, dynastic Congress party's corruption was witnessed by the whole country, and the whole of Telangana is seeing the level of corruption in the state by BRS...both BRS & Congress are dangerous… pic.twitter.com/Mwh7ua6bKp
— ANI (@ANI) July 8, 2023
कडक सुरक्षा व्यवस्था- पंतप्रधानांच्या वारंगल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांनी वारंगलचे आयुक्त आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली. कुमार म्हणाले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
3,500 हून अधिक पोलीस तैनात- वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मामुनूर, भद्रकाली मंदिर आणि कला महाविद्यालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आल्याचे वारंगलचे पोलीस आयुक्त ए.व्ही. रंगनाथ यांनी सांगितले. सुरक्षा व्यवस्थेत 3,500 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ट्रॅफिक अॅडव्हायझरी आधीच जारी करण्यात आली आहे. 6 ते 8 जुलै दरम्यान वारंगलला नो-फ्लाय झोन घोषित करण्यात आले आहे.