नवी दिल्ली : देशात प्लॅस्टीकच्या प्रदूषणाचा मोठा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे प्लॅस्टीकचे प्रदूषण संपवण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई येथे आयोजित जी 20 पर्यावरण आणि शाश्वत हवामानावर आयोजित बैठकीत शुक्रवारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोजेक्ट लॉयन आणि प्रोजेक्ट डॉल्फीन लवकरच पूर्ण होणार असल्याचेही स्पष्ट केले. जगातील 70 टक्के वाघ भारतात असणे ही पर्यावरण संवर्धनाचीच उपलब्धी असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स : जगातील 70 टक्के वाघ भारतात आढळून येतात. भारताने पर्यावरण संवर्धनासाठी चांगले काम केल्यामुळेच जगातील सगळ्यात जास्त वाघ आपल्या देशात आढळून येतात. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धन असल्याचा हा पुरावा आहे. टायगर प्रकल्पामुळे देशात सर्वाधिक वाघ आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. भारतात मांजरीच्या संवर्धनासाठी बिग कॅट अलायन्स प्रकल्प सुरु केला आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारत जगातील पहिल्या 5 देशांपैकी एक असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत दिली.
प्रोजेक्ट लायन आणि प्रोजेक्ट डॉल्फिन : देशात पर्यावरण समृद्ध असणे गरजेचे आहे. सध्या गुजरातच्या गीर प्रांतात सिंह आढळून येतात. त्यामुळेच आम्ही आगामी काळात प्रोजेक्ट लॉयन आणि प्रोजेक्ट डॉल्फिनवर देखील काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. प्रोजक्ट लॉयन आणि प्रोजेक्ट डॉल्फीनमुळे नक्कीच फायदा होणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
जैवविविधता संवर्धनासाठी भारत सातत्याने करतो प्रयत्न : नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारत हा जगातील पहिल्या 5 देशांपैकी एक आहे. आम्ही 2070 पर्यंत शून्य लक्ष्य गाठण्याचे देखील ठरवले आहे. आंतरराष्ट्रीय सौर उर्जेसाठी आघाडीद्वारे इतर भागीदार देशासोबत मदत करणे सुरू असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. जैवविविधता संरक्षण आणि संवर्धनासाठी भारत सातत्याने प्रयत्न करण्यात आघाडीवर असल्याची माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -