ETV Bharat / bharat

PM Modi on INDIA Alliance : इंडिया आघाडीला सनातन धर्म नष्ट करायचा आहे; पंतप्रधान मोदींची टीका - मुख्यमंत्री एम के स्टॅलिन

PM Modi on INDIA Alliance : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी आघाडी भारतावर सनातन धर्माचा नायनाट करण्याचा आणि भारताला हजार वर्षांच्या दास्यत्वात बुडविण्याचा कट रचल्याचा आरोप केलाय. द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म हा सामाजिक न्यायाच्या विरोधात असून त्याचे निर्मूलन केले पाहिजे, अशा वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची विधान केलंय.

इंडीया आघाडीला सनातन धर्म नष्ट करायचा आहे
PM Modi on INDIA Alliance
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 4:17 PM IST

बीना (मध्य प्रदेश) PM Modi on INDIA Alliance : डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मासंबंधीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राजकारण चांगलंच तापलय. यावरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीवर तीव्र शब्दांत टीका केलीय. इंडिया आघाडीला सनातन धर्म (Sanatan Dharma) नष्ट करायचा असून भारताला हजार वर्षांच्या दास्यत्वात बुडविण्याचा कट रचल्याचा आरोप इंडिया आघाडीवर केलाय. मध्य प्रदेशातील बीना येथील सभेत पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केलीय.

  • #WATCH | Bina, Madhya Pradesh: Prime Minister Narendra Modi says "The people of this INDIA alliance want to erase that 'Sanatana Dharma' which gave inspiration to Swami Vivekananda and Lokmanya Tilak...This INDIA alliance wants to destroy 'Sanatana Dharma'. Today they have openly… pic.twitter.com/wc0C2hBxtS

    — ANI (@ANI) September 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इंडिया आघाडीवर जोरदार टीका : पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, घमंडिया आघाडीने नुकतीच मुंबईत बैठक घेतली. यात आघाडीचे राजकारण आणि रणनीती दोन्ही आखल्याचं दिसून येतं. या बैठकीत त्यांनी भारताचा सांस्कृतिक वारसा कमी करण्याच्या उद्देशाने एक गुप्त अजेंडा देखील तयार केलाय. भारतीयांच्या श्रद्धेवर घाला घालणं, हजारो वर्ष जुने विचार, मूल्ये आणि परंपरांनी या देशाला एकत्र बांधलं आहे. मात्र हे मोडून काढण्याभोवती इंडिया आघाडीची योजना फिरते असंही पंतप्रधानांनी म्हटलंय. अहिल्याबाई होळकरांसारख्या दिग्गजांना प्रेरणा देणारी सनातन संस्कृती आणि परंपरा नष्ट करण्याचं इंडिया आघाडीचं ध्येय असल्याचंही मोदींनी म्हटलंय. सनातन धर्मानेच झाशीची राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांना आव्हान देण्याची आणि झाशीवरची अतूट निष्ठा जाहीर करण्याची ताकद दिल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. महात्मा गांधींचेही जीवन आणि विचारधारा घडवण्यातही सनातन धर्माची भूमिका असल्याचं सांगत मोदी म्हणाले, त्यांनी प्रभू रामापासून प्रेरणा घेऊन, त्याच्या अस्तित्वाचा एक आवश्यक भाग मानलं. "हे राम" या त्यांच्या शेवटच्या शब्दांवरुन हे सिद्ध होतं. तसंच स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांच्यावरही सनातन संस्कृतीचा खोलवर प्रभाव पडला होता, असंही मोदी म्हणाले.

असे प्रयत्न हाणून पाडा : येत्या काळात ते आमच्यावरील हल्ले अधिक तीव्र करतील. सनातन धर्माचे प्रत्येक अनुयायी, या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, या देशाच्या लोकांना प्रिय मानणाऱ्या सर्वांनी जागृत राहाणे आवश्यक आहे. सनातन धर्म नष्ट करणे आणि भारताला हजार वर्षांच्या दास्यतेत बुडविणे हे त्यांचं ध्येय आहे. तथापि, अशा शक्तींचे मनसुबे आपण एकत्रितपणे हाणून पाडले पाहिजेत, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी सभेदरम्यान सहकाऱ्यांना दिलाय. तामिळनाडूमधील मंत्री तथा डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं हे वक्तव्य आलंय. भारतीय जनता पक्षानं विरोधी आघाडी आणि त्यातील घटक पक्षांना लक्ष्य करण्यासाठी या टीकचं त्वरीत भांडवल केलं. मात्र, उदयनिधी स्टॅलिन हे त्यांच्या विधानावर ठाम राहिले असून त्यांचे वडील तथा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याकडून त्याना पाठिंबा मिळतोय. दुसरीकडे काँग्रेस, आप आणि तृणमूल काँग्रेससह इंडिया आघाडीतील काही पक्ष त्यांच्या या वक्तव्यापासून दूर आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांतील वैचारिक वादांमुळे भारतातील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सनातन धर्माचं भवितव्य हा वादाचा मुद्दा म्हणून उदयास येत आहे.

हेही वाचा :

  1. FIR Against Udhayanidhi Stalin : सनातन धर्म वाद प्रकरण; तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिनवर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  2. Udhayanidhi Stalin : मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा प्रताप; 'सनातन धर्मा'ची तुलना 'डास' आणि 'मलेरिया'शी
  3. Sanatana Dharma Remark Row: बाळासाहेब ठाकरे हयात असते तर...स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.