अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी पावागडला पोहोचले आहेत. पावागड मंदिरातील महाकाली माता मंदिरात पंतप्रधानांनी दर्शन घेतले. यासोबतच पंतप्रधानांनी महाकाली मातेच्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिराचे उद्घाटन केले.
मंदिराला सोन्याचा मुलामा - महाकाली माता मंदिराच्या नव्याने बांधलेल्या शिखरावर सोन्याचा मुलामा असलेल्या ध्वजस्तंभावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पावागडचे हे मंदिर सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अत्यंत विलोभनीय असे आहे. त्याचा जीर्णोद्धार केल्याने ते अधिकच उठावदार दिसत आहे.
पंतप्रधानांचे मंदिराकडे लक्ष - मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन एप्रिलमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येतात. यापूर्वी 2017 मध्ये पंतप्रधानांनी मंदिराच्या पुनर्निर्मित भागाची पायाभरणी केली होती. आज या संपूर्ण मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
हे महाकाली मंदिर अत्यंत सुरेख आहे. त्याची निर्मिती उच्च प्रतिच्या शिळांपासून करण्यात आली आहे. अत्यंत जुने मंदिर असल्याने त्याचे सुंदर पद्धतीने पुनर्निर्माण करुन जिर्णोद्धारित मंदिर तयार करण्यात आले आहे.