ETV Bharat / bharat

आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथीस डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ शिवाय इतर फ्रंटलाईन वर्कर्स यांच्याशी संवाद साधला. यावेळी कोरोनाच्या परिस्थितीबाबत डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले.

मोदी
मोदी
author img

By

Published : May 21, 2021, 3:48 PM IST

वाराणसी - देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथीस डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ शिवाय इतर फ्रंटलाईन वर्कर्स यांच्याशी संवाद साधला. यावेळी कोरोनाच्या परिस्थितीबाबत डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. कोरोनाच्या काळात आपण अनेकांना गमावलं आहे, असे ते म्हणाले.

आपली लढाई एका रुप बदलणाऱ्या धुर्त आशा अदृश्य शत्रूशी आहे. त्यामुळे सतर्क राहायला हवे. काशीचा मी सेवक आहे. या नात्याने मी सर्व काशीवासियांचे आभार मानतो. येथील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांचे काम कौतूकास्पद आहे, असे मोदी म्हणाले. तसेच कोरोनासह आता ब्लॅक फंगस हाही एक आजार समोर आला आहे. ब्लॅक फंगसचा सामना करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

दुसऱ्या लाटेत संक्रमणाचा प्रसार वेगाने -

'जिथे रुग्ण तिथे उपचार' हे नवा मंत्र आहे. त्यानुसार सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करून गावातील घरा-घरात जाऊन औषधांचे वितरण करण्यात येत आहे. हे चांगले अभियान आहे. या अभियानाला आणखी व्यापक करण्यात यावे, असे मोदी म्हणाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमणाचा प्रसार वेगाने होत आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर दबाव निर्माण झाला आहे, असेही मोदी म्हणाले.

कोरोना परिस्थितीचा आढावा -

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारी संवाद साधून मोदींनी आपल्या मतदारसंघातील कोविड आणि नॉन-कोविड रुग्णालयांचा आढावा घेतला. पंतप्रधानांच्या कार्यालयाने याबाबत माहिती दिली. दरम्यान पंतप्रधान मोदींनी कालच (गुरुवारी) दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन, तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी या सर्व राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश होता.

हेही वाचा - पिनराई विजयन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; शरद पवारांच्या आमदाराला मंत्रीमंडळात स्थान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.