ETV Bharat / bharat

'मन की बात' : आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत ‘व्होकल फॉर लोकल’वर जोर - आत्मनिर्भर भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. या वर्षातील मोदींचा हा अखेरचा मन की बात कार्यक्रम होता. जनता कर्फ्यू, मेड इन इंडिया, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल, अशा विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं.

मन की बात
मन की बात
author img

By

Published : Dec 27, 2020, 12:15 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. हा या मालिकेचा 72 वा भाग होता. तसंच या वर्षातील मोदींचा हा अखेरचा मन की बात कार्यक्रम होता. जनता कर्फ्यू, मेड इन इंडिया, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल, अशा विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी मोदींनी नागरिकांनी पाठवलेल्या पत्राचा उल्लेख केला. या सगळ्या पत्र आणि संदेशांमध्ये, मला एक गोष्ट समान दिसली, की बहुतेकांनी देशाचे सामर्थ्य, देशवासीयांच्या सामूहिक शक्तीचे कौतुक केले आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे -

  • जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग जेव्हा संपूर्ण जगासाठी प्रेरणा बनला, देशवासीयांनी टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून आपल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून आपली एकता दाखविली, त्याचं लोकांनी स्मरण केलं आहे. अनेक आव्हानं, बर्‍याच समस्या आल्या. कोरोनामुळे जगातील पुरवठा साखळीत अडथळे आले, परंतु आम्ही प्रत्येक संकटापासून नवीन धडे घेतले. देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली ती म्हणजे ‘आत्मनिर्भरता’ होय.
  • व्होकल फॉर लोकल या मंत्रानुसार आपली उत्पादने ही जागतिक दर्जाची असायला हवीत, असे मोदींनी उत्पादक आणि उद्योजकांना म्हटलं. दरवर्षी नवीन वर्षाचा संकल्प करतो, यावेळी आपण आपल्या देशासाठी देखील एक संकल्प करणे आवश्यक आहे. ज्या परदेशी वस्तू आपण वापरतो, त्यासाठी भारतात बनविलेले पर्याय शोधा. भारतातील कष्टकरी लोकांनी त्यांच्या कष्टाने बनविलेल्या उत्पादनांचा वापर करू, असे ठरवा.
  • देशातील हजारो वर्ष जुनी संस्कृती, परंपरा वाचविण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे, आजचा दिवस त्याचे स्मरण करण्याचा आहे. श्री गुरु गोविंदसिंग जी यांच्या कुटुंबाने दिलेल्या बलिदानाने संपूर्ण मानवतेला, देशाला एक नवीन शिकवण दिली, आपली संस्कृती सुरक्षित ठेवण्याचे मोठे कार्य केले.
  • २०१४ ते १८ दरम्यान भारतातील बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. २०१४ मध्ये देशात बिबट्यांची संख्या सुमारे ७,९०० होती, तर २०१९ मध्ये ही संख्या वाढून १२,८५२ झाली. देशातील बर्‍याच राज्यांत, विशेषत: मध्य भारतात, बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे. अनेक वर्षांपासून जगभरात बिबट्याला अनेक धोक्यांना सामोरे जावे लागत आहे, जगभरातील त्यांचे वास्तव्य धोक्यात आले होते. अशा वेळी बिबट्यांची संख्या सातत्याने वाढवून भारताने संपूर्ण जगाला एक मार्ग दाखविला आहे.
  • गेल्या काही वर्षांत भारतातील सिंहांची, वाघांची संख्याही वाढली, वनक्षेत्रही वाढले. सरकारसोबत बरेच लोक, आणि संस्थाही वृक्ष आणि वन्यजीव यांच्या संरक्षणामध्ये सहभागी झाल्याने हे शक्य झाले आहे. हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत.
  • देशातील युवकांना पाहिल्यानंतर मला आनंदी आणि आश्वस्त जाणवतं. देशातील युवकांपुढच कोणतंही आव्हान मोठं नाही. करू शकतो, करेन ही भावना त्यांच्यामध्ये आहे. याचबरोबर देशभरात कोरोनाच्या या काळात शिक्षकांनी ज्या अभिनव पद्धती अवलंबल्या, अभ्यासक्रमाची सामुग्री सृजनात्मकरित्या तयार केली. ती ऑनलाईन शिक्षणाच्या या काळात अमूल्य आहे.
  • कश्मीरी केशर प्रामुख्याने पुलवामा, बडगाम आणि किश्तवाड़ सारख्या ठिकाणी उगवलं जातं. याच वर्षी मे महिन्यात काश्मिरी केशरला भौगोलिक संकेत टॅग म्हणजेच GI Tag देण्यात आले. याच्या माध्यमातून आपण काश्मिरी केशराला एक जागतिक लोकप्रिय ब्रँड बनवू इच्छितो. त्यामुळे केशर उत्पादकांना अधिक चांगला मोबदला मिळण्याचीही शक्यता दिसू लागली आहे.

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून पद सांभाळल्यानंतर त्याच वर्षी 5 ऑक्टोबर 2014 रोजी ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू केला होता. देशातील जनतेशी रेडिओच्या माध्यमातून ते संवाद साधतात.

हेही वाचा - बळजबरीने पैशांची वसुली केल्याप्रकरणी ८ तृतीयपंथीयांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.