ETV Bharat / bharat

PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान सन्मान निधीचा 11वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित

11व्या हप्त्यात 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 21 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिमल्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पीएम मोदींव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ( Minister Anurag Thakur  ) आणि हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर सहभागी ( Himachal Chief Minister Jai Ram Thakur ) झाले होते.

PM Kisan Samman Nidhi
पीएम किसान सन्मान निधी
author img

By

Published : May 31, 2022, 3:32 PM IST

शिमला- पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी शिमला येथे ( PM Modi in Shimla ) पोहोचले. शिमल्यात त्यांनी पीएम किसान सन्मान निधीच्या 11व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर ( PM Kisan Samman Nidhi ) हस्तांतरित केले. या 11व्या हप्त्यात 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 21 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले.

केंद्रातील मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिमल्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पीएम मोदींव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ( Minister Anurag Thakur ) आणि हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर सहभागी ( Himachal Chief Minister Jai Ram Thakur ) झाले होते. शिमल्यात, पंतप्रधान मोदींनी देशभरात उपस्थित असलेल्या केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी ऑनलाईन चर्चा केली.

दरवर्षी 6 हजार रुपये खात्यावर होतात जमा-पीएम-किसान योजनेअंतर्गत ( PM KISAN scheme ) वर्षभरात पात्र शेतकऱ्याला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2 हजार रुपये अशी दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो.

पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग -पंतप्रधान शेतकरी सन्मान नीधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो.

हेही वाचा-Awantipora encounter: अवंतीपोरा येथे दोन दहशतवादी ठार

हेही वाचा-Padma Awards 2023: पद्म पुरस्कार-2023 साठी नामांकनाची अंतिम मुदत 15 सप्टेंबर

हेही वाचा-Hardik patel to join BJP : गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, हार्दिक पटेल 2 जून रोजी भाजपमध्ये करणार प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.