नवी दिल्ली/वॉशिंग्टन - अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना खास भेट दिली आहे. कमला हॅरिस यांचे आजोबा हे केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी होते. त्यांची पत्रे ही कमला हॅरिस यांना हस्तशिल्पाच्या फ्रेममध्ये भेट म्हणून देण्यात आली आहेत. सोबतच गुलाबी मीनाकारी बुद्धीबळ सेटही देण्यात आला आहे.
अमेरिकेच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची व्हाईट हाऊसमध्ये गुरुवारी भेट घेतली आहे. अमेरिका आणि भारत हे नैसर्गिक मित्र असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील रणनीतीची भागीदारी आणखी बळकट करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आणि हॅरिस यांनी बैठकीदरम्यान दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे असलेले जागतिक मुद्दे आणि लोकशाहीला असलेले धोके आधी मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
हेही वाचा-अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे भारतीय 'कनेक्शन'
म्हणून पंतप्रधान मोदींनी दिलेल्या भेटवस्तू आहेत खास-
हॅरिस यांच्याबरोबरील द्विपक्षीय बैठक अत्यंत महत्त्वाची ठरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याचे सूत्राने सांगितले. अत्यंत जिव्हाळ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी त्यांच्या आजोबांच्या पत्रांच्या प्रती दिल्या आहेत. हॅरिस यांचे आजोबा पी. व्ही. गोपालन हे केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ आणि आदरणीय अधिकारी होती. त्यांनी विविध भूमिका पार पाडल्या होत्या, असे सरकारमधील सूत्राने सांगितले. जगातील सर्वात जुन्या शहरापैकी वाराणसी हे शहर आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. या शहरामधील गुलाब मीनाकारी हा बुद्धिबळाचा सेटही त्यांना देण्यात आला आहे.
हेही वाचा-अमेरिकेच्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे भारताशी नाते काय ?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉर्रिसन यांना चंदेरी गुलाबी मीनाकारी जहाज दिले होते. तर जपानचे उपपंतप्रधान योशिहिडे सुगा यांना चंदनाचा बुद्ध पुतळा देण्यात आला होता.
कमला हॅरिस यांच्यावर आजोबांचा प्रभाव...
कमला हॅरिस यांनी आपला लहानपणीचा बराच काळ हा आजोबांसोबत (आईचे वडील) घालवला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्या तामिळनाडूतील घरी येत. कमला यांचे आजोबा सनदी अधिकारी होते. 'माझे आजोबा भारतातील प्रमुख स्वतंत्र सेनानींपैकी एक होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते चैन्नईमध्ये राहत. तेव्हा दररोज सकाळी समुद्र किनारी फिरायला जात. तेव्हा राजकारण, भ्रष्टाचार, न्याय अशा विषयांवर ते चर्चा करत. त्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. त्यामुळे माझ्यात प्रामाणिकपणा आणि सत्यभावना निर्माण झाली', असे कमला हॅरिस यांनी 2009 मध्ये एका प्रचार कार्यक्रमात सांगितले होते.
हेही वाचा-पंतप्रधान मोदी सहभागी होत असलेल्या 'क्वाड देशांची बैठक' नेमकी काय आहे? जाणून घ्या..