ETV Bharat / bharat

Saluting Bravehearts : भारताला अंतराळात पोहोचवणारे डॉ. विक्रम साराभाई!

भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमहत्त्वांना समाल करण्यात येत आहे. भारताच्या अंतराळ संशोधनात मोलीची भूमिका बजावणाऱ्या शूरांचेही यात समावेश आहे. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई ( Dr Vikram Sarabhai ). कोण होते डॉ. साराभाई? त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा रिपोर्ट..

author img

By

Published : Aug 9, 2022, 4:30 PM IST

Updated : Aug 9, 2022, 7:22 PM IST

Dr Vikram Sarabhai
Dr Vikram Sarabhai

मुंबई - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आगळ्या ( Azadi Ka Amrit Mahotsav ) वेगळ्या पद्धतीने संपूर्ण भारतात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. अशावेळी भारताच्या या अमृत महोत्सवी अनेक शूरांना आणि भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमहत्त्वांना समाल करण्यात येत आहे. भारताच्या अंतराळ संशोधनात मोलीची भूमिका बजावणाऱ्या शूरांचेही यात समावेश आहे. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई ( Dr Vikram Sarabhai ). कोण होते डॉ. साराभाई? त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा रिपोर्ट..

कोण होते डॉ. विक्रम साराभाई? : विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी गुजरातमधील अहमदाबाद शहरात झाला. ते एका व्यापारी कुटुंबातील होते. विक्रम अंबालाल हे साराभाई आणि सरला साराभाई यांच्या आठ मुलांपैकी एक होते. अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमधून इंटरमिजिएट सायन्सची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. भारतात परत आल्यानंतर त्यांनी वैश्विक किरणांवर संशोधन करण्यासाठी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. हे त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांच्या सल्ल्यानुसार. 1942 मध्ये 'टाइम डिस्ट्रिब्युशन ऑफ कॉस्मिक रेज्' हा त्यांचा पहिला वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित झाला. कॉस्मिक किरणांवर संशोधन करण्यासाठी ते १९४५ मध्ये केंब्रिजला परतले आणि 'उष्णकटिबंधीय अक्षांशांमध्ये वैश्विक किरणांचे अन्वेषण' या विषयावरील प्रबंधासाठी पीएचडी मिळवली. कुटुंबातील कोणीही राजकारण किंवा समाजकारणात सक्रियपणे कार्यरत नसले, तरी साराभाई कुटुंबाचे आणि तत्कालीन राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचे घरी-येणे जाणे असायचे. रविंद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरूंपासून ते अगदी महात्मा गांधीजींपर्यंत. पुढे शिक्षण घेत असताना डॉ. विक्रम साराभाईंना टागोरांनी तर अगदी जवळून मदत केली, सूचना दिल्या, मार्गदर्शन केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली होती. म्हणूनच त्यांना 'भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार' असेही म्हटले जाते.

अवकाश संशोधन क्षेत्राची पायाभरणी : ब्रिटनमधून परतल्यानंतर डॉ. विक्रम साराभाई यांनी 11 नोव्हेंबर 1947 रोजी फिझिकल रिसर्च लॅबची स्थापना केली. येथूनच त्यांनी खगोलशास्त्र, भौतिकशास्त्रातील संशोधनाची पायाभरणी करण्यास सुरुवात केली. अवकाश क्षेत्रात भारत आज उंच भरारी घेत असताना, ज्या संस्था हे यश मिळवत आहेत, त्यांची पायाभरणी करण्यास डॉ. विक्रम साराभाई यांनी 1950च्या दशकातच सुरुवात केली होती. 21 नोव्हेंबर 1965 हा दिवस भारताच्या अवकाश संशोधनातील अत्यंत सुवर्ण दिवस ठरला. कारण याच दिवशी भारताने पहिले रॉकेट लाँच केले. तेही डॉ. विक्रम साराभाई यांच्या अथक प्रयत्न आणि पुढाकारातूनच. केरळमधील थुंबा येथे लाँचपॅड निश्चित करण्यात आले होते. तिथेही अनेक लहान-मोठ्या अडथळ्यांना डॉ. साराभाईंना सामोरे जावे लागले. मात्र या सगळ्यावर मात करत रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. याचा परिणाम असा झाला की, संयुक्त राष्ट्राने पुढे या केंद्राला आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली. ATIRAची स्थापना करून भारतातील वस्त्रोद्योगाचा पाया डॉ. साराभाईंनी रचला ECIL, UCIL यांसारख्या संस्थांसह IIM-अहमदाबादची स्थापना सुद्धा डॉ. विक्रम साराभाई यांनीच केली.

'इस्रो'ची स्थापना : अवकाश संशोधनासाठी भारत सरकारने 1962 साली समिती नेमली. अर्थात, या समितीचं नेतृत्त्व डॉ. विक्रम साराभाई यांनीच केले. डॉ. साराभाई यांच्या ज्ञानाचा आणि दूरदृष्टिचा इथेही फायदा झाला. 1969 साली याच समितीच्या शिफारशीतून 'भारतीय अवकाश संशोधन संस्था' अर्थात तुम्हा-आम्हाला अधिक ओळखीची असलेली 'इस्रो'ची स्थापना करण्यात आली. इस्रोने पुढे अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचे नाव अमेरिका, रशिया यांसारख्या प्रगत देशांच्या यादीत नेऊन ठेवले.

'या' पुरस्काराने झाला सन्मान : डॉ. विक्रम साराभाई यांना 1966 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर 1962 साली शांतीस्वरुप भटनागर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर 1972 साली डॉ. साराभाई यांचा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

डॉ. विक्रम साराभाईंचा मृत्यू : डॉ विक्रम साराभाई यांचे ३० डिसेंबर १९७१ रोजी निधन झाले. पण आजही भारतीय शास्त्रज्ञ त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतात. अंतराळ उपग्रहांमुळे आज ग्रामीण भागात दूरचित्रवाणीच्या प्रसारणामुळे शेती, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला मदत होत असून देशातील गरीब शेतकऱ्यांना हवामान अंदाजाचे अनेक फायदे मिळत आहेत.

हेही वाचा - Saluting Bravehearts : अणुसंशोधनात मोलाची भूमिका बजावणारे डॉ. अनिल काकोडकर; वाचा, सविस्तर...

Last Updated : Aug 9, 2022, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.