ETV Bharat / bharat

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला - केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल

1 एप्रिल म्हणजे आजपासून देशभरातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), दिल्ली येथे कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

Piyush Goyal
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल
author img

By

Published : Apr 1, 2021, 3:31 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), दिल्ली येथे कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाच्या संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाच्या मोहिमेला वेग आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत एकूण 6,51,17,896 लस डोस देण्यात आले आहेत.

1 एप्रिल म्हणजे आजपासून देशभरातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी हे जाहीर केले होते. 16 जानेवरीला भारतामध्ये कोरोना लसीकरणाला सुरवात झाली होती. यात वैद्यकीय कर्मचारी, कोरोना योद्धे, 60 वर्षांवर वय असणारे नागरिक आणि इतर गंभीर आजार असलेले 45 वर्षांवर वय असणारे नागरिक यांना कोरोनाची लस देण्यात आली होती. आता 45 वर्षावरील नागरिकांना लस टोचवण्यात येणार आहे.

देशातील नामवंत व्यक्तिनी घेतली लस

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्यासह देशातील अनेक नामवंत व्यक्तिनी कोरोनाची लस घेतली आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या आई हिराबाई मोदी यांनीही कोरोनाची लस घेतली आहे.

हेही वाचा - अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.