नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावर मोदी सरकारने मोठी जबाबदारी सोपविली आहे. केंद्रीय मंत्री गोयल यांची राज्यसभेचे सभागृहनेते पदी निवड करण्यात आली आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे. यंदाच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे थावरचंद गहलोत यांच्याजागी राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. थावरचंद गहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गोयल हे सभागृहाचे उपनेते होते.
हेही वाचा-विकृतीचा कळस, 40 वर्षीय महिलेवर बलात्कार
थावरचंद यांनी रविवारी कर्नाटकच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे. संसदेचे व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करत पीयूष गोयल यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की पीयूष गोयल यांची राज्यसभा सभागृह नेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांना देशसेवेसाठी शुभेच्छा.
हेही वाचा-DA hike केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी; महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ!
पीयूष गोयल यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झालेली आहे. यापूर्वी गोयल यांच्याकडे यापूर्वी वाणिज्य, उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग या विभागांची जबाबदारी होती. गोयल यांनी राज्यसभेत मोदी सरकारची बाजू मांडण्याची महत्त्वाची जबाबदारीही पार पाडली आहे.
हेही वाचा-पंजाब सरकारकडून 2.85 लाख शेतमजूर आणि भूमिहीन शेतकऱ्यांना कर्जमाफी
19 जुलैपासून संसदेचे अधिवेशन-
यंदाचे संसदेचे पावसाळी (मान्सून) अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे. तर 13 ऑगस्टला संपणार आहे. यामध्ये 19 दिवस कामकाजाचे दिवस असणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नुकतेच दिली आहे. कोरोना महामारीत संसदेचे हे दुसरे मान्सून अधिवेशन असणार आहे. सामान्यत: संसदेचे मान्सून अधिवेशन हे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. तर स्वातंत्र्यदिनापूर्वी संसदेचे मान्सून अधिवेशन संपते. संसदीय व्यवहार समितीने अधिवेशनाच्या तारखाबाबत शिफारस केली होती. त्यानुसार 19 जुलैला लोकसभेचे मान्सून अधिवेशन सुरू होणार आहे. संसदेच्या अधिवेशनात कोरोनाच्या काळातील सर्व नियमांचे पालन केले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले.