नवी दिल्ली: भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. यात महाराष्ट्रातुन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal ) राज्याचे माजी मंत्री डाॅ. अनिल बोंडे (Dr Anil Bonde) तसेच धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांची उमेदवारी घोषीत केली आहे. राज्यसभा निवडणुकीवरुन सध्या महाराष्ट्राचे वातावरण तापले आहे. शिवसेना सहाव्या जागेसाठी लढत असुन शिवसेनेने आपल्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.
-
Bharatiya Janata Party (BJP) releases another list of two candidates for the Rajya Sabha elections pic.twitter.com/VEacllyWXH
— ANI (@ANI) May 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bharatiya Janata Party (BJP) releases another list of two candidates for the Rajya Sabha elections pic.twitter.com/VEacllyWXH
— ANI (@ANI) May 29, 2022Bharatiya Janata Party (BJP) releases another list of two candidates for the Rajya Sabha elections pic.twitter.com/VEacllyWXH
— ANI (@ANI) May 29, 2022
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या जागेसाठी प्रयत्न केले पण शिवसेनेने त्यांना शिवबंधन घालण्याची अट ठेवली शेवटी त्यांनी निवडणुकीतुन माघार घेतली. त्या नंतर भाजपने तिसऱ्या जागेसाठी तयारी सुरु केली असे वातावरण तयार केले होते पण भाजपने आज जाहिर केलेल्या यादी नुसार महाराष्ट्रातुन दोन उमेदवारांची नावे अधिकृतरित्या जाहिर केले आहेत.
अमरावती: भाजपच्या वतीने राज्यसभेसाठी डॉ. अनिल बोंडे यांचे नाव निश्चित झाल्यामुळे अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मोर्शी विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर अनिल बोंडे यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. 2009 मध्ये डॉ. बोंडे हे अपक्ष उमेदवार म्हणून मोर्षी मतदारसंघातून विजयी झाले होते तर 2014 मध्ये भाजपची उमेदवारी घेऊन डॉ. अनिल बोंडे यांनी मोर्शी मतदार संघात बाजी मारली होती.
-
देशाचे यशस्वी पंतप्रधान @narendramodi जी, गृहमंत्री @AmitShah जी, राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष @JPNadda जी, विरोधी पक्षनेते मा. @Dev_Fadnavis जी, प्रदेश अध्यक्ष मा. @ChDadaPatil जी यांनी बहुजन समाजाच्या कार्यकर्तावर विश्वास टाकुन राज्यसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. pic.twitter.com/VAh1urNEYD
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) May 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">देशाचे यशस्वी पंतप्रधान @narendramodi जी, गृहमंत्री @AmitShah जी, राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष @JPNadda जी, विरोधी पक्षनेते मा. @Dev_Fadnavis जी, प्रदेश अध्यक्ष मा. @ChDadaPatil जी यांनी बहुजन समाजाच्या कार्यकर्तावर विश्वास टाकुन राज्यसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. pic.twitter.com/VAh1urNEYD
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) May 29, 2022देशाचे यशस्वी पंतप्रधान @narendramodi जी, गृहमंत्री @AmitShah जी, राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष @JPNadda जी, विरोधी पक्षनेते मा. @Dev_Fadnavis जी, प्रदेश अध्यक्ष मा. @ChDadaPatil जी यांनी बहुजन समाजाच्या कार्यकर्तावर विश्वास टाकुन राज्यसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. pic.twitter.com/VAh1urNEYD
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) May 29, 2022
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अखेरच्या तीन महिन्यांसाठी डॉक्टर अनिल बोंडे यांनी कृषिमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र अल्पशा फरकांनी डॉ. बोंडे पराभूत झाले होते. शेतकरी नेते अशी ओळख असणारे डॉक्टर अनिल बोंडे यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी बळकट होण्यास वाव असून विदर्भाचा विकास सुद्धा त्यांच्या माध्यमातून साधू शकणार अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांना आहे.
कृषी विकासासाठी डॉ. अनिल बोंडे यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे. त्यांना कृषी क्षेत्रात दांडगा अनुभव आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी त्यांची नेहमीच धडपड राहिली आहे. कृषी च्या माध्यमातून विदर्भाचा विकास कसा साधला जावा यासाठी त्यांचे आजवरचे कार्य असून राज्यसभेत वर्णी लागल्यावर डॉ. अनिल बोंडे यांच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल असा विश्वास भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांनी डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबाबत व्यक्त केला.