भाटापारा (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील बालोदाबाजार भाटापारा जिल्ह्यातील खमरिया गावाजवळ गुरुवारी रात्री उशिरा पिकअप आणि ट्रकची धडक झाली. ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून तर 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. पिकअपमधील सर्व लोक एकाच कुटुंबातील असून ते एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खिलोरा गावातून अर्जुनी गावात आले होते.
पिकअपला भरधाव ट्रकने धडक दिली : रात्री बारा वाजण्याच्या सुमारास खमारिया येथील डीपीडब्ल्यूएस शाळेजवळ पिकअपला भरधाव ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअपचा चक्काचूर झाला. अपघातात 4 मुलांसह 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 10 हून अधिक जखमी झाले आहेत. 3 जखमींना रायपूरला रेफर करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच भाटापारा पोलीस रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. या घटनेतील जखमींना रुग्णालयात नेण्यात आले तर मृतांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. बालोदाबाजारचे एसपी दीपक झा यांनी 11 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
पिकअपचा या अपघातात चक्काचूर कार्यक्रम आटोपून सर्व जण पिकअपमध्ये बसून अर्जुनी येथून घरी परतत होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास खमारिया येथील डीपीडब्ल्यूएस शाळेजवळ पिकअपला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअपचा या अपघातात चक्काचूर झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 3 जखमींना रायपूरला रेफर करण्यात आले आहे.
बालोद जिल्ह्यातील अपघातात ४ जणांचा मृत्यू बुधवारी बालोद जिल्ह्यातील खापरवाडा गावात झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश होता. हे कुटुंब बालोद जिल्ह्यातील रहिवासी असून काही कामानिमित्त रायपूरला गेले होते. पण तिथेच त्याची गाडी बिघडली आणि त्याने कॅब घेतली. भाड्याने घेतलेल्या कॅबमधून परतत असताना ही घटना घडली.