ETV Bharat / bharat

Blackmailed with Nude Photos and Raped: अंघोळ करताना घेतली नग्न छायाचित्रे, वर्षभर केला बलात्कार, १६ लाखांना लुटले

author img

By

Published : Mar 3, 2023, 1:35 PM IST

विजयवाडा पोलिसांनी एका महिलेचे गुपचूप नग्न फोटो काढून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी आणि वर्षभराहून अधिक काळ तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी एका प्लंबरला अटक केली आहे. आरोपीवर 16 लाखांची खंडणी घेतल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.

PHOTOS TAKEN WHILE TAKING A BATH RAPED A WOMAN FOR A YEAR STOLE RS 16 LAKH ACCUSED IN CUSTODY
अंघोळ करताना घेतली नग्न छायाचित्रे, वर्षभर केला बलात्कार, १६ लाखांना लुटले

विजयवाडा (आंध्र प्रदेश) : विजयवाडा येथील अजित सिंह नगरमध्ये एका महिलेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. विजयवाडा पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आक्षेपार्ह फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून आरोपीने पीडितेवर एकापेक्षा जास्त वेळा बलात्कार केला. यासोबतच महिलेला धमकावून 16 लाख रुपयेही हडप केले. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने ती आंघोळ करत असताना गुपचूप तिचे फोटो काढले होते. त्यानंतर इंटरनेटवर टाकण्याची धमकी द्यायला सुरुवात केली.

वर्षभर केला बलात्कार: पीडितेचा आरोप आहे की, एक वर्षाहून अधिक काळ त्याने तिच्याकडून अनेक वेळा लाखो रुपये (16 लाख) घेतले. यादरम्यान आरोपीने पीडितेवर अनेकवेळा बलात्कारही केला. पीडितेने आरोपीला अधिक पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर आरोपीने पीडितेवर हल्ला केला. त्यात पीडितेला खूप दुखापत झाली. दुखापतीबद्दल विचारले असता, पीडितेने प्रथमच कुटुंबातील सदस्यांना त्रासाची संपूर्ण कहाणी सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऑनलाईन पेमेंटवरून मिळाला नंबर: सीआय काघ्या श्रीनिवास राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालंधरा कॉलनीत राहणारा पुट्टा सुभाष (४५) हा बीपीसीएल कंपनीत प्लंबर म्हणून काम करतो. पीडित महिला पतीसोबत दुकान चालवते. जिथे पीडितेची आरोपीशी ओळख झाली. सुभाषने दुकानात वस्तू खरेदी केल्याप्रकरणी आणि फोनपे आणि पेटीएमद्वारे अनेक वेळा पेमेंट केल्याप्रकरणी महिलेचा फोन नंबर मिळवला होता. मग तो छोट्या कामासाठी घरी ये-जा करू लागला.

फोटो व्हायरल करण्याची धमकी: एके दिवशी पीडिता तिच्या घरी आंघोळ करत असताना त्याने गुपचूप तिचे फोटो काढले. आरोपीने पीडितेला चित्रे दाखवली आणि धमकी दिली की जर तिने त्याचे ऐकले नाही, तर तो फोटो सार्वजनिक करेल. आरोपीने पीडितेवर अनेकवेळा बलात्कारही केला. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पीडितेला धमकावले आणि 16 लाख रुपये रोखही घेतले. सीआय श्रीनिवास राव यांनी सांगितले की, आरोपी सुभाषला रिमांडवर घेण्यात आले आहे.

हेही वाचा: NIA Warrant Against Militants: एनआयए कोर्टाचे १३ दहशतवाद्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट, जम्मू काश्मिरात केल्या कुरापती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.