अयोध्या: मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांची पवित्र जन्मभूमी असलेल्या अयोध्येत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे (Ayodhya shri ram mandir construction). ट्रस्टचे अधिकारी वेळोवेळी बांधकामासाठी अधिकृत कार्यकारी संस्था, लार्सन अँड टुब्रो आणि टाटा कन्सल्टन्सीच्या तांत्रिक तज्ञांशी चर्चा करत असतात. तसेच वेळोवेळी या बांधकामाच्या प्रगतीशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध करून सर्वसामान्यांना मंदिराचे बांधकामआणि राम भक्तांना राम मंदिर उभारणीच्या प्रगतीची माहितीही देत असतात. ट्रस्टने मंदिर उभारणीची नवीन छायाचित्रे प्रसिद्ध करून राम मंदिराच्या कामाच्या प्रगतीची माहिती सर्वसामान्यांना दिली आहे. ताज्या फोटोंमध्ये मंदिराच्या बांधकामाचे विहंगम दृश्य दिसत आहे. ज्यामध्ये रामाचे भव्य मंदिर बांधले जाणार आहे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची छायाचित्रे आहेत.
गर्भगृहाची भिंत उभारली - अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीच्या कामाच्या प्रगतीबाबत सांगताना अधिकारी म्हणाले, मंदिराच्या गर्भगृहाची भिंत उभारली जात आहे. त्यात आतापर्यंत सुमारे 75 दगड बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर मंदिराचे व्यासपीठ तयार करण्यासाठी कर्नाटकातील सुमारे 10800 ग्रॅनाइट दगड बसविण्यात आले आहेत. यासोबतच मंदिराचा पाया संरक्षित करण्यासाठी तीन दिशांना रिटेनिंग वॉल बांधण्यात येत आहे. त्यावर मंदिराभोवती भिंत बांधण्यात येणार आहे. ही संपूर्ण योजना 5 एकरात आकारास येत आहे. संकुलात मंदिराच्या बांधकामानंतर, प्रवासी सुविधा केंद्र, राम कथा मंडप गोशाळा आणि मल्टी-थिएटर बांधण्याची योजना आहे.
चौथ्या थराचे काम टप्प्याटप्प्याने सुरू - श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, प्लिंथच्या बांधकामासाठी 17000 दगड घ्यायचे आहेत. त्यापैकी 14 हजारांहून अधिक आले आहेत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या थराचे काम पूर्ण झाले आहे. चौथ्या थराचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. ज्या ठिकाणी गर्भगृहाच्या बांधकामासाठी दगड ठेवण्याचे काम सुरू होते, तेथेही प्रगती होत आहे. सुमारे 75 दगड बसविण्यात आले असून गर्भगृह बसवण्याचे काम खालून वरच्या दिशेने सुरू झाले आहे. सध्या गर्भगृहाच्या कक्षा बांधण्याचे काम सुरू आहे. ते संथगतीने पुढे सरकणार आहे. आता उंचीचे काम वाढत आहे. रिटेनिंग वॉलचे काम सुरू आहे. निम्मे काम दक्षिण दिशेला, निम्मे उत्तरेला आणि निम्मे पश्चिम दिशेचे जवळपास पूर्ण झाले आहे.