ETV Bharat / bharat

NIA ON PFI : ISIS सारख्या संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी PFI पदाधिकारी मुस्लिम तरुणांची भरती करीत होते, एनआयएचा दावा - ऑल इंडिया पसमंदा मुस्लिम महाज

ISIS सारख्या संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी PFI पदाधिकारी मुस्लिम तरुणांची भरती करीत होते, असा दावा एनआयएने केला ( Recruitment of Muslim youth by PFI for ISIS ) आहे. ऑल इंडिया पसमंदा मुस्लिम महाजने ( All India Pasmanda Muslim Mahaz ) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( PFI ) सदस्यांवर कारवाई (अटक) करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पीएफआयला मुस्लिम समाजातूनच विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.

NIA ON PFI
NIA ON PFI
author img

By

Published : Sep 23, 2022, 4:12 PM IST

Updated : Sep 23, 2022, 5:19 PM IST

नवी दिल्ली - ISIS सारख्या संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी PFI पदाधिकारी मुस्लिम तरुणांची भरती करीत होते, असा दावा एनआयएने केला आहे. ( Recruitment of Muslim youth by PFI for ISIS ) एनआयएने पीएफआयच्या देशभरातील अनेक कार्यालयांवर छापे टाकून कारवाई केल्यानंतर पीएफआयकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केरळमध्ये या संघटनेने बंद पुकारला आहे. पार्श्वभूमीवर एनआयएने आता दावा केला आहे की, ISIS सारख्या संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी PFI पदाधिकारी मुस्लिम तरुणांची भरती करीत होते.

एनआयएची पीएफआयवर देशभरात कारवाई सुरू असतानाच पीएफआयला आता मुस्लिम समाजातूनही विरोध होऊ लागला आहे. ऑल इंडिया पसमंदा मुस्लिम महाजने ( All India Pasmanda Muslim Mahaz ) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( PFI ) सदस्यांवर कारवाई (अटक) करण्यासंदर्भात प्रेस रिलीज जारी केले आहे.

PFI इस्लामचे तारणहार म्हणून काम करीत असल्याची दाखवत देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही त्यांच्या धोरणांचा वारंवार निषेध केला आहे आणि त्यांच्यावर बंदी घालण्याची विनंती केली आहे, असे ऑल इंडिया पसमंदा मुस्लिम महाजने ( All India Pasmanda Muslim Mahaz ) म्हटले आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरुद्धच्या देशव्यापी कारवाईचे कौतुक करताना, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की ते PFI विरुद्ध कारवाई करण्यासाठी राज्यपाल म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील.

गेल्या काही काळापर्यंत संस्थेवर कोणतीही जबरदस्ती कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला. खान म्हणाले, मी राज्यपाल म्हणून माझ्या जबाबदाऱ्या पार पाडीन. ते (PFI) केरळमध्ये खूप सक्रिय आहेत. संघटनेच्या सदस्यांनी केरळमधील एका प्राध्यापकाचा हात कापल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय राजधानीत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण) या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात खान सहभागी झाले होते.

Last Updated : Sep 23, 2022, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.