मुंबई : इंधनाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीवर अवलंबून (petrol diesel rates today) असतात. कारण, आपण बहुतांश इंधन हे आयात करतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल 61 डॉलर प्रती बॅरल पर्यंतवर गेले आहे. त्यामुळे देशात इंधनाच्या किमती वाढत आहेत. इंधनावरच्या करांबद्दल म्हणाल तर केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकारं इंधनावर कर लावत असतात. आणि करातून सरकारांना महसूल मिळतो. विकासाची गरज लक्षात घेऊन हे कर लावले जातात. जेव्हा गरज वाटली तेव्हा दरवेळी केंद्राने इंधनावरील एक्साईज ड्युटी कमी केली ( petrol diesel rates today 7 December 2022 ) आहे.
- इंधनाचे दर नियंत्रित : तेल किंवा इंधनाचे दर नियंत्रित करण्याचा आणखी एक मार्ग सरकारकडे आहे, तो म्हणजे तेल कंपन्या रिटेल व्यावसायिकांना देत असलेला दर नियंत्रित करणे. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या (Petrol Diesel Rates Today in Maharashtra) आहेत.
- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 76 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 26 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 92 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 80 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 17 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 68 पैसे आहे.